नागपूर : केसात कोंडा होणे किंवा डँड्रफमागे अनेक कारणे आहेत. कोरड्या हवेत, हिवाळ्यात ही समस्या बळावते. वातावरणातला बदल, चुकीचा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरणे यामुळेही कोंडा होतो. तेव्हा कुठल्या महागड्या शॅम्पूने नव्हे तर घरगुती पदार्थांचा वापर करून डँड्रफची समस्या दूर करू शकता.

ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे तेल सम प्रमाणात घ्या. ते मिश्रण केसांच्या मुळांना लावत हलक्या हाताने मालीश करा. डँड्रफ राहणार नाही.
दहीमुळेही डँड्रफची समस्या दूर होते. केस धुण्याआधी सुरुवातीला केसांना दही लावा. अर्धा तासांनी केस कोमट पाण्याने धुवा.
खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. मग केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळेही डँड्रफची समस्या दूर पळते.
तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करा. ती पावडर तेलात एकत्र करून डोक्याला लावा. अर्धा तासाने केस कोमट पाण्याने धुवा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here