संजीव वेलणकर
नवरात्रीचा आजचा सहावा दिवस. रंग लाल. लाल रंगाची स्ट्रॉबेरी हे मूळ उत्तर अमेरिकेचे फळ आहे. त्यानंतर त्याचा प्रसार युरोप मध्ये झाला. स्ट्रॉबेरी फळाभोवती खास श्रीमंतीचे वलय आहे. फ्रांन्स इतिहासातली राणी मॅडम टॅलियन आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्ट्रॉबेरीने अंघोळ करत असे. काहीजण स्ट्रॉबेरीने दिर्घायुष्य लाभते म्हणत तर अर्जेंटीनात स्ट्रॉबेरी विषारी म्हणून निषिध मानली जात असे, अमेरिकेत स्ट्रॉबेरी उत्सव केले जातात. अश्या अनेक आख्यायिका स्ट्रॉबेरीशी निगडीत आहेत. लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीची तिच्या मोहक सुगंध आणि चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून ओळख आहे. ज्यांनी वेगवेगळ्या आइसक्रीम, मिल्क शेक, चॉकलेट आणि जाम बनवण्यासाठीही स्ट्रॉबेरीचा वापर होतो. आपल्याकडे महाबळेश्वर, पाचगणी येथे सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. स्ट्रॉबेरी केवळ चविला चांगली लागते म्हणून खायची नाही तर, तिचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.
स्ट्रॉबेरी मेदरहीत असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
स्ट्रॉबेरी सेवनामुळे हृद्यविकार आणि मधुमेहावर मात करता येते.
स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो.
स्ट्रॉबेरी ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी देखील लाभकारक आहे.
स्ट्रॉबेरीमुळे मोतिबिंदू होण्यापासून संरक्षण होते.
स्ट्रॉबेरीतील ‘क’ जीवनसत्वामुळे डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो.
स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्सीलडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
यातील ‘क’ जीवनसत्व त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
पोटॅशिअम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृद्यविकाराचा झटका टाळण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.
सायट्रीक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीमध्ये असल्याने दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून देखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटीऑक्सीडंटस आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते.
मँगेनिज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीत असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडेदुखीपासून दिलासा मिळतो.

स्ट्रॉबेरी पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
काही पदार्थ स्ट्रॉबेरीचे.
स्ट्रॉबेरी मिल्क शेक
साहित्य. १५ स्ट्रॉबेरीज, २ वाटय़ा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, १/२ वाटी थंड दूध, २ चमचे मिल्क पावडर, १ ते २ टीस्पून साखर
कृती. मिल्क पावडर दुधात नीट मिक्स करावी. दूध पावडर + दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज, आणि आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवावे. २ ग्लासेसमध्ये ओतावे. स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करावे. मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घालावेत. मिल्कशेक पिताना मधेमधे चांगले लागतात.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर वरती आईस्क्रीमचा स्कूप किंवा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकतो.
स्ट्रॉबेरीज जॅम
साहित्य. १/ २ किलो स्ट्रॉबेरी, ३०० ग्राम साखर ३ कप , दालचिनी चा १ इंच हा तुकडा , अर्धा लिंबू.
कृती. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्या. देठ चिरून घ्या, व याच्या ४ फोडी करून घ्या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज तापलेल्या पातेल्यात घाला वरून साखर घाला आणि १ १/२ ग्लास पाणी घाला व मंद याचे वर या स्ट्रॉबेरीज शिजू द्या. साधारणतः ५ मिनिटांनंतर यात दालचिनीचा तुकडा घाला व लिंबू पिळा आणि झाकण लावूंन जाम शिजू द्या ३० ते ४० मिनिट तरी स्ट्रॉबेरी शिजायला वेळ लागेल या दरम्यान सतत ढवळत राहा जो पर्यंत घट्ट होत नाही तो पर्यंत हे मिश्रण शिजू द्या. ४५ मिनीटानंतरर आपल्याला जो घट्ट पणा हवा आहे तो मिळेल एका प्लेट वर या सिरप चे काही थेंब ओता जर ते ओघळले तर आणखीन शिजवा जर मिश्रण ओघळला नाही तर गॅस बंद करा मग यातून दालचिनीचा तुकडा बाहेर काढून घ्या. एका चाळणीने हे मिश्रण गाळून घ्या व स्ट्रॉबेरीज घोटून घ्या उरलेला लगदा ही यात मिसळा तुम्ही यासाठी हॅन्ड ब्लेंडर चा वापर हि करून शकता आता तयार जॅम एका बरणीत भरा व एका तासा साठी फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवा.
Esakal