दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल IPL 2021 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad आणि रॉबिन उथप्पा यांची अर्धशतके आणि महत्त्वाच्या क्षणी धोनीने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर CSK ने विजय मिळवला. ऋतुराजने ७० धावा काढल्या आणि त्याच्या याच कामगिरीवर चाहते खूश झाले. मात्र त्याच्या या कामगिरीबद्दल नेटकऱ्यांनी अभिनेत्री सायली संजीवला Sayali Sanjeev शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ऋतुराज आणि सायली यांच्यामध्ये नक्की काहीतरी शिजतंय, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यामुळे आता ऋतुराजच्या चांगल्या कामगिरीवर नेटकऱ्यांनी सायलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी ऋतुराजचा उल्लेख केला. काहींनी तर ऋतुराजला टॅग करत कमेंट्स केल्या आहेत. ‘आज तुमचे हे चांगले खेळले’, ‘ऋतुराज नाम तो सुना होगा’ अशा कमेंट्स ऋतुराजच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा: BBM 3: सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकरांना मिळतं इतकं मानधन

सायलीच्या फोटोशूटवर ऋतुराजने केली होती कमेंट

सायलीने सेटवरील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. यामध्ये तिने राखाडी रंगाचा पोलका डॉट डिझाइनचा हाय स्लीट वन पीस परिधान केला होता. वन आणि त्यावर पांढरे शूज असा तिचा कूल लूक होता. याच फोटोवर ऋतुराजने ‘Woahh’ अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. ऋतुराजच्या या कमेंटवर सायलीनेही हृदयाचे इमोजी पोस्ट केले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here