अमेरिकेची प्रसिद्ध टेनिस स्टार मार्टिना नवरातिलोवा हिचे एक ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. मार्टिनाने आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदींसंदर्भात केलेली टिप्पणी विनोदी आहे, असा उल्लेख मार्टिनाने आपल्या व्हायरल होणाऱ्या ट्विटमध्ये केलाय. अमित शाहा यांनी एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. भारतामध्ये मोदींसारखा नेता आजपर्यंत झालेला नाही, असे शाहांनी मुलाखतीमध्ये म्हटले होते.
हे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या हिंदुस्थान टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात ट्विट रिट्विट करत हा माझा पुढचा विनोद या कॅप्शनसह मार्टिनाने मोदी-शाह जोडगोळीवर निशाणा साधला आहे. मार्टिनाच्या या ट्विटनंतर भारतातील अनेक मंडळी तिला ट्रोल करत आहेत. एवढेच नाही तर मार्टिना कोण ? याचा शोधही गूगलवर सुरु आहे.

हेही वाचा: बेभान झालेल्या नेटकऱ्यांना मॅक्सवेलनं झोडपलं
कोण आहे मार्टिना नवरातिलोवा?
मार्टिनाचा जन्म चेकोस्लोवाकियामध्ये झाला. सध्याच्या घडीला ही दिग्गज टेनिस स्टार 64 वर्षांची आहे. टेनिस जगतात विशेष छाप सोडणाऱ्या मार्टिना यांच्या नावे 59 मोठ्या स्पर्धा जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. यात 18 ग्रँड स्लॅम सिंगल, 31 वुमन्स डबल आणि 10 मिक्स्ड डबल्स स्पर्धा जिंकल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत तिने 170 एकेरी आणि 125 दुहेरी सामने जिंकले आहेत.
हेही वाचा: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला
जगातील सर्वात श्रीमंत महिला टेनिस स्टार अशीही तिची ओळख आहे. आपल्या हॉट अदाकारिनं नेहमी चर्चेत असणाऱ्या मार्टिना नवरातिलोवा यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये रस असल्याचे तिने जाहिररित्या स्पष्ट केले होते. मार्टिनाने जवळपास 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रशियन सुंदरी ज्युलिया हिच्यासोबत विवाह केला होता. विवाहाच्या वेळी मार्टिना 58 वर्षांची होती. तर तिची आयुष्याची जोडीदार 42 वर्षांची होती. लेखिका रीटा आणि ज्यूडी नेल्सन यांच्यासोबतच्या अफेअरनंतर मार्टिनाने ज्युलियाशी विवाह केला आहे.
मार्टिना व्यावसायिक आहे. ती सध्या ज्युलिया स्किन केयर कंपनी चालवते. जी पॅरिसमध्ये आहे. मार्टिना 18 वर्षांची असताना अमेरिकेत आली. तिला हा देश इतका आवडला की तिने इथेच राहण्याचे ठरवले. 1981 मध्ये तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
Esakal