नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ऐश्वर्या त्यांचे विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

नुकतेच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
५१ वर्षीय ऐश्वर्या नारकर यांचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहून ‘वय हा केवळ आकडा आहे’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे.
ऐश्वर्या यांनी मालिकांमध्ये अधिक काम केल्यामुळे त्या महाराष्ट्राच्या तमाम गृहिणी वर्गाच्या लाडक्या आहेत.
बऱ्याचदा साडीमध्ये दिसणाऱ्या ऐश्वर्या यांनी आधुनिक फॅशनलाही आपलंसं केलं आहे.
इन्स्टाग्रामवर त्यांनी साडीच्या लूकमधील बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होतो.
ऐश्वर्या यांचा हा वेगळा अंदाज पाहून चाहतेसुद्धा भारावले आहेत.
ऐश्वर्या यांनी मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
विविध अंदाजातील ऐश्वया यांच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Esakal

30 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here