बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रिचा चड्ढा Richa Chadha ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अली फजलसोबत Ali Fazal रिलेशनशीपमध्ये आहे. हे दोघेही सोशल मिडियावर सक्रिय असतात. रिचा आणि अली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वीच एका नेटकऱ्याने त्यांचं लग्न टिकणार नसल्याची टीका केली. सोशल मीडियावर सडेतोड विधानं करणाऱ्या रिचानेही त्या नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं. रिचाचं हेच ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.
‘तुमचा घटस्फोट कधी होणार ते आम्हाला सांगा. कारण, अमिर खानच्या लग्नासारखेच तुमचेही लग्न टिकणार नाहीये’, असं खोचक ट्विट एका नेटकऱ्याने केलं. त्यावर रिचा म्हणाली, ‘सर्वेश माझं सोड, तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत कोणत्याही मुलीने स्वत:च्या इच्छेने लग्न केले नाही म्हणून तुझं डोकं फिरलंय का? तुझ्याबाबतीत मुलीकडचेच हुंडा मागतील. अरे, तुला ना अक्कल आहे आणि ना तू दिसायला चांगला आहे. त्यात तू गरीब पण आहेस. तुझ्या आईने तर LPG गॅस वापरायचे सोडून चूल वापरायला सुरु केले असेल. काकू नमस्कार, हा असला कसला मुलगा तुम्ही जन्माला घातला आहे? तुझ्यासारखा बेरोजगार माणूस फक्त इथेच बोलण्याचे धाडस करू शकतो.”
हेही वाचा: Samantha |”ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला”

अली आणि रिचा गेल्या वर्षी लग्न करणार होते, पण कोरोनामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती अलीबद्दल म्हणाली होती, “आम्ही लॉकडाउनपासून एकत्र राहतोय. आम्ही घरातील कामे विभागून घेतली आहेत. आम्ही निश्चितपणे एकमेकांना स्पेस देतो. अली हा उत्तम स्वयंपाक करतो, तो घरदेखील स्वछ ठेवतो. माझ्यासाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.” रिचाला याआधीही अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते, “मला अलीच्या कुटुंबीयांकडून आणि अलीकडून खूप प्रेम मिळाले आहे. पण मला त्या लोकांबद्दल खेद वाटतो, जे दुसऱ्यांच्या नातेसंबंधांवर नेहमीच प्रश्न उपस्थित करतात.”
Esakal