IPL 2021 Eliminator: विराट कोहलीच्या RCB संघाला कोलकाता संघाकडून पराभूत व्हावे लागले. RCB चा कर्णधार म्हणून हा विराटचा शेवटचा सामना ठरला. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने शेवटच्या षटकात १३९ धावा केल्या. विराटची RCBचा कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आली. सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिश्चन याची खूप धुलाई झाली. त्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी टीका केली आणि त्याच्या पत्नीलाही टीकेचा सामना करावा लागला.
हेही वाचा: ‘ग्लॅमरस IPL’ … मॅचपेक्षाही ‘या’ तरूणींच्या अदांचीच चर्चा!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डॅनियल ख्रिश्चन याच्यासाठी कोलकाताविरूद्धच्या एलिमिनेटरचा सामना खूपच वाईट गेला. त्याला फारशा धावा तर करता आल्या नाहीच. पण त्यासोबतच त्याच्या एका षटकात सुनील नारायणने त्याला थेट षटकारांची हॅटट्रिक मारली. त्याच्या त्या एका षटकामुळे सामना पालटला. डॅन ख्रिश्चनच्या वाईट कामगिरीमुळे त्याच्यावर टीका झालीच पण त्याच्यासोबतच ख्रिश्चनच्या गर्भवती पत्नीवरही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. लोकांच्या रोषाबद्दल ख्रिश्चनने नाराजी व्यक्त केली. मला सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही, पण किमान माझ्या पत्नीवर टीका करू नका. ती गर्भवती आहे, अशी विनंती त्याने चाहत्यांना केली.

Esakal