सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिच्या इन्स्टा स्टेटमुळे तिचे नाव कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर शुबमन गिल यांच्यासोबत जोडले गेल्याचे पाहायला मिळाले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोला फ्रेंड्स आणि फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते.
साराच्या इन्स्टा स्टेटमुळे तिचे नाव कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर शुबमन गिल यांच्यासोबत जोडले गेल्याचे पाहायला मिळाले होते.
सारा-शुबमन यांनी मात्र चर्चेवर मौनच बाळगणे पसंत केले. सध्याच्या घडीला साराचा आणखी एक फोटो चर्चेत आहे.
साराने बाल्कनीत उभा राहिलेला एक खास फोटो इन्स्टाच्या माध्यमातून शेअर केलाय. चेहऱ्यावरील स्मित हास्यासह काढलेला हा फोटो बॉलिवूड अभिनेता आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या कार्तिक आर्यन याने लाईक केलाय. त्याच्याशिवाय अरमान मलिकनेही फोटोला पंसती दिली आहे.
साराच्या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here