बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवणारी अभिनेत्री म्हणून पूजा हेगडे प्रसिद्ध आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणूनही पूजाची ओळख आहे. टॉलीवूडमध्ये तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ऋतिकसोबत तिनं दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या मोहेनजोदारोतून पदार्पण केलं होतं. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. मात्र त्यात पूजाच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयक काही गोष्टी माहिती करुन घेऊयात.

पूजा हेगडेचा जन्म हा मुंबईतला. ती लहानाची मोठी मुंबईतच झाली. तिचे आईवडील मंजुनाथ हेगडे आणि लथा हेगडे मुळचे कर्नाटकचे आहेत. मुंबईत राहिलेल्या पूजाचं मराठीही चांगलं आहे. कन्नड मातृभाषा असणारी पूजा अस्स्खलित मराठी बोलते. तिला पाच भाषा येतात. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड़
पूजा 2010 मध्ये मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाली होती. मात्र त्यात तिला दुर्देवानं यश मिळवता आलं नाही. तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर तिनं 2010 मध्ये मिस इंडिया साऊथ ग्लॅमरस हेअर स्पर्धा जिंकली.
त्या पारितोषिकांनंतर पूजा हेगडेनं चित्रपट क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार केला. तिनं सुरुवातीला तमिळ चित्रपटातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कॉलीवूडमधून चित्रपट विश्वात येणाऱ्या पूजाचा पहिला चित्रपट मुगामोडी हा होता.
2012 मध्ये पूजा एक प्रमुख अभिनेत्री म्हणून समोर आली. त्या चित्रपटानं पूजाला मोठी लोकप्रियताही मिळवून दिली होती. त्यासाठी तिला बेस्ट फिमेल अॅवॉर्डसाठीचे नॉमिनेशनही मिळाले होते.
पूजानं कॉलीवूड, टॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. 2012 मध्ये मुगामोडी, 2015 मध्ये ओका लेला कोसम आणि 2016 मध्ये मोहेनजो दारो अशी त्या चित्रपटांची नावं आहेत.
प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन सोबत तिनं मोहेन जो दारोमध्ये काम केलं. आशुतोष गोवारिकर यांची पत्नी सुनीता गोवारिकर यांनी पूजाचं नाव सुचवलं होतं. स्क्रीन टेस्ट झाल्यावर पूजाला त्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here