(Dussehra Holiday Plan) जगभरात कोरोना महामारीमुळे लोकांना खूप काळ घरातच कैद राहावे लागले. ज्यांना प्रवासाची आणि ट्रेकिंगची आवड आहे, अशा उत्साही लोकांच्या इच्छाही अपुऱ्या राहिल्या. पण आता बरीच पर्यटन स्थळे हळूहळू खुली होत आहेत. त्यातही आनंदाची बाब ही की पुढचा आठवडा हा सुट्टीचा आहे. १४ ऑक्टोंबरला रामनवमी आणि १५ ऑक्टोबरला विजयादशमीची सुट्टी असेल. मग १६ ऑक्टोबरला शनिवार तर १७ तारखेला रविवार आहे. यानंतर १९ ऑक्टोबरलाही ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. जर तुम्ही १८ तारखेलाही सुट्टी घेऊ शकत असाल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच…कारण तुम्ही या ६ दिवसांत अगदी सहजपणे चांगल्या ठिकाणी सहलीचे नियोजन करु शकता. तेही फक्त १० हजार रुपयांच्या आत…



पिथौरागढ (उत्तराखंड): हे प्रसिदध ठिकाण तसं पाहता हिलस्टेशन नाही, परंतु येथील हवामान १२ ही महिने खूप चांगले असते. पर्वतांनी वेढलेल्या या शहराचे सौंदर्य नजरेत भरते.

शिवपुरी (उत्तराखंड): पौराणिक धार्मिक स्थळे आणि आश्रमांव्यतिरिक्त, ऋषिकेश उंच पर्वत आणि घनदाट जंगलांसाठीदेखील ओळखला जातो. हे ठिकाण दिल्लीपासून २४४ किमी अंतरावर आहे. इथून जवळच शिवपुरी हे ठिकाण आहे. येथे वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय बंजी जंपिंग, वॉटरफॉल, क्लाइंबिंग आणि ट्रेकिंगसाठीदेखील येथे जाता येते.

शोघी, हिमाचल प्रदेश: हे प्रसिद्ध ठिकाण मधुचंद्रासाठी येऊ पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्यांसाठी एकदम योग्य असं ठिकाण आहे. याशिवाय जे लोक कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितात, त्यांनाही या ठिकाणाचा साधेपणा नक्की आवडेल. जर तुम्हाला शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस वेळ असेल तर येथे भेट देण्यास विलंब करू नका.

खज्जियार: हिमाचल प्रदेश मध्ये स्थित, खज्जियारला भारताचे छोटे स्वित्झर्लंड म्हटले जाते. जर तुम्हाला शांतता आणि निसर्गसौंदर्य एकत्रितपणे बघायचे असेल, तर खजियारपेक्षा चांगली जागा मिळणार नाही. हे ठिकाण सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. फक्त १० हजार रुपयांमध्ये तुम्ही या ठिकाणाची सफर अगदी आरामात करू शकता.


भरतपूर पक्षी अभयारण्य (राजस्थान): भरतपूर पक्षी अभयारण्य हे जगातील सर्वोत्तम पक्षी अभयारण्यांपैकी एक आहे आणि याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. येथे तुम्हाला पक्ष्यांच्या हजारो दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या प्रजाती पाहायला मिळतील.


माउंट अबू: राजस्थानमधील या प्रसिद्ध हिलस्टेशन जुलैमध्ये हलक्या पावसाच्या सरी अनुभवता येतात. माउंट अबू मध्ये आपण रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग आणि रॅपेलिंग सारख्या उपक्रमांचा आनंद घेऊ शकाल. कॅम्पिंग आणि ट्रेकिंग व्यतिरिक्त, घोडेस्वारी आणि हॉट एअर बलूनची मजादेखील येथे घेता येते. पावसाळ्यात येथील हवामान आणखी चांगले होते. इथेही तुम्हाला फिरायला तितकीच रक्कम खर्च करावी लागेल.
Esakal