लॉकडाऊनमुळे गेली 2 वर्षे लोकं वर्क फ्रॉम होम करत होते. यायचा जायचा वेळ वाचत असल्याने, तसेच काम करता करता एकीकडे घराकडेही चांगले लक्ष देत असल्याने लोकांना हा पर्याय आवडू लागला. तर, अधिक चांगले आणि क्रिएटिव्ह काम होत असल्याने कर्मचाऱयांनी घरून काम करणेच योग्य, असा विचार कंपन्या करू लागल्या. काही ठिकाणी अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, लॉकडाऊनचे नियमही शिथिल केल्याने आता पुर्वीचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे आता काही कंपन्यांनी त्यांचे वर्क फ्रॉम होम बंद केले. त्यामुळे आता दोन वर्षांनंतर पुन्हा कामावर जायला अनेकांनी सुरूवात केली आहे. पण घरून काम करण्याची सवय लागलेल्या अनेकांना पुन्हा ऑफिसमध्ये येऊन काम करणे जरा जडच जात आहे. त्यामुळे त्यांच्यात ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यालयात पुन्हा यायला काही गोष्टीं लक्षात ठेवायला हव्या.

घरातून काम केल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो

घरातून काम केल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो

महिलांना सर्वाधिक त्रास

महिला घरातील सर्व जबाबदारी पूर्ण करून ऑफिसला येतात. लॉकडाऊन काळात गेली 2 वर्ष त्या घरीच होत्या. त्या काळात घरून काम करताना कुटूंबाला, मुलांना पहिल्यापेक्षा अधिक वेळ देता आला. आता मात्र पुन्हा ऑफिस सुरू करताना त्यांना अधिक त्रास होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ कठीण आणि आव्हानात्मक असणार आहे.

मोठे आव्हान

एखाद्या गोष्टीची सवय लागली ती सुटायला वेळ लागतो. अगदी तसेच काहीसे लोकांचे झाले आहे. लोकांना घरून काम करताना व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधण्याची सवय होऊन गेली होती. मात्र, 2 वर्षांनंतर पुन्हा ऑफिस सुरू करताना त्यांना आधीची सवय सोडणे कठीण जातआहे. रोज मोठा प्रवास करून ऑफिसला येणे, हे आव्हान वाटत आहे. कर्मचाऱयांमध्ये घडलेला हा मोठा बदल स्विकारण्यासाठी त्यांना योग्य वेल देणे गरजेचे आहे.

दृष्टीकोन बदलणे गरजेचे

कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकांनी कामाच्या ठीकाणि निमयांची अंमलबजावणी करताना नियमांबाबत काही काळ सावधगिरीने पावले उचलावीत. कारण सुरवातीच्या काळात कर्मचारी कसे वागतात यावरही बऱयात गोष्टी अवलंबून असतील. सोशल असणाऱयांना पुन्हा कामावर येणे आवडेल. पण फार कोणात मिक्स न होणाऱया, अबोल लोकांना हा बदल स्विकारणे अंमळ जड जाईल. त्यांना सहकाऱयांशी पुन्हा पुर्वीसारखा संवाद साधण्यास अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा: नवरात्रीत उपवासा दरम्यान फॉलो करा ‘हा’ हेल्दी डाइट प्लान

मानसिक आरोग्याचा विचार महत्वाचा

या काळात लोकांना चिंता आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. वैयक्तिक दृष्टिकोन आणि कार्यालयीन वातावरणावर लोकांचे कार्यालयांमध्ये परत येणे अवलंबून असेल. त्यासाठी कर्मचाऱयांच्या मानसिक बदलांचा विचार केला जाणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा: बदामाच्या तेलाची मालिश लहान मुलांसाठी फायदेशीर आहे की नाही?

काम

काम

कामाच्या वातावरणाचाही प्रभाव

दोन वर्षांनंतर कार्यालयात परत आल्यानंतर ऑफिसचे वातावरण काम करण्यासाठी योग्य असल्याची खात्र कंपन्यांनी केली पाहिजे. त्यासाठी कठोर नियमांना काही काळ फाटा देऊन वातावरण सुखद, आणि आनंदी असले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. जोपर्यंत कर्मचारी नियमित कामावर येत नाहीत तोपर्यंत कामाची पद्धत लवचिक असली पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑफिस स्पेसमध्येही थोडे बदल करावेत.

बदल स्विकारा

कर्मचाऱयांनी हळूहळू बदलत्या परिस्थितिशी जुळवून घेणे गरजेचे आहे. कर्मचारी एक संघटित दिनक्रम स्वीकारू शकतात. ज्यामुळे त्यांना ते दोन वर्षांपूर्वी जसे होते, तसे आठवून त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये रूळणे सोयीचे जाईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here