नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे येथील चीपा चा नाला या ठिकाणी रात्री 12.30 वाजता आयशर ट्रक (TS-30-T-8886) व चारचाकी (MH-15-TC1721) यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी मधील मेडिकल औषध कंपनीचे एम आर असलेले नाशिक येथील तीन तरुण जागीच ठार झाले.
अपघातग्रस्त चारचाकीमधील भूषण बदान, शरद महाजन, राजेश तिवारी हे तिघेही नाशिक येथील असून पुणे येथून नाशिक कडे येत असताना नांदुर-शिंगोटे येथे हा अपघात झाला. या अपघातात तिघे ही जागीच ठार झाले. सदर अपघाताची माहिती नांदूर पोलिसांना समजताच पोलिसांनी जागेवर जाऊन तिघांना वाहनांतून बाहेर काढून दोडी बुद्रुक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सागर कोते करत आहे.

अपघाताची भीषणता ईतकी होती कि, चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
हेही वाचा: लासलगाव : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
हेही वाचा: नाशिक : अवैध इंधन विक्री करणाऱ्यांवर कारवाई
Esakal