सध्या, दोन्ही देशांचे सैन्य दहशतवादविरोधी सहकार्य वाढविण्यावर भर देऊन एक मोठा लष्करी सराव करत आहेत.

भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (MM Naravane) हे मंगळवारपासून चार दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka) आहेत.
द्विपक्षीय लष्करी संबंध अधिक विस्तारित करण्यासाठी नरवणेंनी श्रीलंकेला भेट दिलीय. शिवाय, चीनच्या कुरघोडीला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांनी रणनिती आखली असल्याचेही समजते.
कालच लष्करप्रमुखांनी श्रीलंकेच्या उच्च सैन्य अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा केली. तसेच, राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांची भेट घेतली.
लष्करप्रमुख म्हणून नरवणे यांचा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी श्रीलंकेतील विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी देशातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला आणि व्यापक अशी चर्चाही केली.
आज लष्करप्रमुख नरवणे यांनी श्रीलंकेतील लष्कराचे गजबा रेजिमेंटल मुख्यालय Gajaba regimental headquarters आणि लष्करी अकादमीला (military academy) भेट दिली. सध्या, दोन्ही देशांचे सैन्य दहशतवादविरोधी सहकार्य वाढविण्यावर भर देऊन एक मोठा लष्करी सराव करत आहेत.
भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील त्रिपक्षीय सागरी सुरक्षा सहकार्य संवादात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोलंबोला दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here