भेंडीची कुरकुरीत भाजी लहान मुलांना खूप आवडते. तसेच भेंडी फ्राय, भिंडी दो प्याजा, भरली भेंडी असे प्रकारही केले जातात. भेंडीही खूप आवडत असली तरी ती करायला किचकट असते. तिच्या गिळमिळतपणामुळे तिला तार सुटते. मग तार सुटू नये म्हणून त्यात चिंच किवा आमसूल घातली जाते. ते तंत्र जमलं की भेंडीची भाजी मस्त होते. ही भाजी खाल्ल्याने शरीराला पोषकतत्वे मिळतात. भेंडीची भाजी खाणं आपण समजू शकतो. पण आता भेंडी घातलेलं पाणी प्यायल्याने फिटनेसही जपला जातोय तसेच वजनही कमी व्हायला मदत होते आहे. त्यामळे okra water प्यायले तर आरोग्याला लाभ होणार आहेत.

असे तयार करा पाणी

एका व्यक्तीसाठी okra water तयार करायचे असेल तर त्यासाठी तीन ताज्या भेंड्या लागतील.या भेंड्यांची वरची आणि खालची टोके काढून टाकून त्या मध्यभागी उभ्या चिरा. एक ग्लासभर पाण्यात रात्रभर ही भेंडी ठेवून सकाळी ते पाणी गाळा. अंशपोटी हे पाणी प्यायल्याचा फायदा होतो. हे पाणी प्यायल्याने आपल्याला कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर, व्हिटामिन्स, फॅट्स, कार्ब्ज मोठ्या प्रमाणात मिळतात.

हेही वाचा: वजन कमी करायचंय, आठवड्यातून दोनदा खा नाचणीची भाकरी

हे आहेत फायदे

1) भेंडीचे पाणी नियमित प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया सुधारते. अनावश्यक चरबी साठण्याचे प्रमाण कमी होत असल्याने वजन वाढीवर आपोआपच नियंत्रण राखता येण्यास मदत होते.

2) भेंडीच्या पाण्यात व्हिटामिन्स आणि अॅन्टीऑक्सिडंट असल्याने हे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. संसर्गजन्य आजारापासून दूर राहायचे असेल तर okra water हा चांगला पर्याय ठरतो.

3) पचनशक्ती चांगली राखण्यासाठी okra waterचा फायदा होतो. अपचनाचा त्रास हे पाणी प्यायल्याने दूर होतो. तसेच पोटही साफ राहते.

4) ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी okra water प्यायल्याने त्यांचा अशक्तपणा दूर होतो. शिवाय हिमोग्लोबिन वाढते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here