नागपूर : आहाराचा शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. शरीरासोबत मानसिक आरोग्य उत्तम राखणे गरजेचे असते. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही घटकांचा आहारात समावेश करता येईल.

अक्रोड खाल्ल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहू शकते. अक्रोडामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असल्यामुळे मेंदूचे कार्य उत्तम सुरू राहते. अक्रोडामधले अँटी ऑक्सडंट्सही वातावरणातल्या फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.
ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरीसारखी फळही मानसिक आरोग्य उत्तम राखण्याच्या कामात मदत करतात. यात भरपूर अँटीऑक्सडंट्स असतात. यामुळे शरीरातल्या पेशींची दुरुस्ती होते.
फ्री रॅडिकल्समुळे झालेले शरीराचे नुकसान भरून निघते. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैराश्य, चिंता, काळजीची तीव्रता कमी होते.
सुरमई, ट्युना अशा गुबगुबीत माशांमधले पोषक घटक मानसिक आरोग्य उत्तम राखायला मदत करतात. यातल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिड्समुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. तसेच स्मरणशक्तीही सुधारते.
दहीमधले प्रोबायोटिक्सही उपयुक्त ठरतात. हे प्रोबायोटिक्स मेंदूचे आरोग्य सुधारतात. त्यांच्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते, पचनशक्तीही सुधारते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहायला मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here