जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता.पन्हाळा येथील मंदिरात सात जून नंतर बंद झालेला पालखी सोहळा उद्या खंडेनवमी निमित्त सुरु होत आहे. सकाळी पालखी विविधरंगी फुलांनी सजविली जाईल . त्यानंतर गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलंच्या जयघोषात सकाळी साडे आठ वाजता पालखी निघेल. तसेच पहाटे गावातील सुहासिनी महिला पारंपारीक पध्दतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम करतील. हा सोहळा ग्रामस्थ, पुजारी यांच्यासमवेत होणार आहे.

चोपडाईदेवीची अलंकारीक महापूजा

चोपडाईदेवीची अलंकारीक महापूजा

दरम्यान,दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी सकाळी पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली . उद्या पहाटे मंदिरात डोंगरावरील महिला पारंपारीक पध्दतीनुसार दिवे ओवाळणी करतील त्याची सर्व तयारी गावातील महिलांनी आज आपल्या घरी केली.

  मुळमाया श्रीयमाई  देवीची सोहन कमळ पुष्पातील  महापूजा

मुळमाया श्रीयमाई देवीची सोहन कमळ पुष्पातील महापूजा

जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास मोठे पारंपरिक महत्त्व असून याठिकाणी नवरात्र उत्सव दिमाखात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे हा सण साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. पण यंदा तो आनंदाने साजरा केला जातोय.आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीमध्ये धुुुपारतीचा सोहळा ढोल ,पिपाणी, सनई यांच्या गजरात मुळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.

श्री काळभैरव देवाची अलंकारीक महापूजा

श्री काळभैरव देवाची अलंकारीक महापूजा

यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते . गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. व या सोहळ्याची सांगता झाली. यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर व परिसरात आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे. आज ही डोंगरावर गर्दी कायम राहिली.ई पास दर्शन पध्दतीवर भरपूर नाराजी आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here