दसरा सुट्टी योजना: नवरात्रीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता दोन दिवसांत दसऱ्याचा सण येत आहे. सणांच्या काळात अनेक सुट्ट्या एकत्र जोडून येतात. अशा स्थितीत अनेकांनी सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी दिल्ली आणि त्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळं निवडली असावीत. म्हणून, जर तुम्ही देखील असेच काही नियोजन करत असाल, तर ही काही ठिकाणं तुमची सु्ट्टी अविस्मरणीय करतील. जिथं फक्त 10 हजार खर्च करून एक संस्मरणीय सहलीचा आनंद घेता येतो.
कसौली (हिमाचल प्रदेश): सणांचा हंगाम सुरू झाला असून बरेच लोक भेट देण्यासाठी पर्यटन स्थळे शोधत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) राहणारे लोक 10 हजार रुपयांत चांगल्या ठिकाणी जाऊ शकतात. जर तुम्ही कसौलीपासून सर्वोत्तम स्थान सुरू केलं, तर कसौली हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी शिमल्यापासून 60 किलोमीटर दूर आहे. कसौली हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. इथं रायडिंग, रोप-वे आणि ट्रेकिंगसोबत लाँग ड्राईव्हचाही आनंद घेता येतो. कसौलीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ती शिमल्यापेक्षा स्वस्त आहे.
खज्जियार (हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशच्या खजियारला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. जर तुम्हाला शांती आणि नैसर्गिक सौंदर्यासह देशात ‘परदेश’ अनुभवायचा असेल, तर तुम्हाला यापेक्षा चांगली जागा मिळणार नाही. हा परिसर सर्वोत्तम हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथंही तुम्ही 10 हजार रुपयांत एक उत्तम सहल पूर्ण करू शकता.
हेही वाचा: सुर्योदय, सुर्यास्त पाहायला आवडतं? मग, ही ठिकाणं आहेत Best

खज्जियार तलाव
हेही वाचा: भारतातील ही आहेत सुंदर 10 बीच..येथे नक्की भेट द्या!
लँडस्डाउन (उत्तराखंड): जर तुम्हाला तुमची दसऱ्याची सुट्टी देवभूमी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) साजरी करायची असेल, तर लँड्सडाउन हा देखील एक उत्तम पर्याय आहे. दिल्लीपासून सुमारे 280 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी कॅम्पिंग, जेवण आणि राहण्याची किंमत फक्त 10,000 च्या आत आहे.
मांडवा (राजस्थान) : राजस्थानमधील मांडवा आपल्या भूतकाळाची भव्यता अभिमानाने दाखवते. हा परिसर सुंदर हवेली आणि भित्तीचित्रांसाठी ओळखला जातो. प्राचीन काळी मध्य-पूर्व आशिया आणि चीनमधील व्यापारी या मार्गाने येत असतं. ज्यामुळे ते व्यापाराचे मुख्य केंद्र होते. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 230 किलोमीटर अंतरावर आहे. याच प्रवासात तुम्ही जोधपूर आणि उदयपूरलाही भेट देऊ शकता.

मांडवा राजस्थान
नीमराना (राजस्थान): दिल्ली-जयपूर महामार्गावरील लोक मोठ्या संख्येनं नीमरानाला भेट देण्यासाठी जातात. 15 व्या शतकातील हे वारसास्थळ आता हॉटेलमध्ये रुपांतर झालंय. नीमराना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात आहे. दिल्लीपासून त्याचे अंतर 122 किलोमीटर आहे. जरी तुम्हाला फक्त एक दिवस सुट्टी असली, तरी तुम्ही ते सहजपणे कव्हर करू शकता.
दमदमा तलाव (हरियाणा): हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दमदमा तलाव आहे. हा एक नैसर्गिक तलाव आहे. ज्याचं सौंदर्य अप्रतिम असं आहे. दिल्ली आणि आजूबाजूचे लोक येथे सहलीसाठी येतात. या सरोवराच्या काठावर तुम्ही निसर्गाची सैर करू शकता. इथं तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता. दिल्लीपासून दमदमा तलावाचे अंतर फक्त एक तास आहे. 10 हजारांपेक्षा कमी बजेट असणाऱ्यांची सहलही इथे पूर्ण होऊ शकते.
हेही वाचा: दसऱ्याच्या 6 दिवसांच्या सुट्टीत ‘या’ 10 ठिकाणी प्लॅन करा सहल

नीमराना राजस्थान
Esakal