अभिनेता टायगर श्रॉफचा Tiger Shroff फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडियाचे Kaizzad Capadia बुधवारी (१३ ऑक्टोबर) निधन झाले. कैझादच्या निधनाचं कारण अद्याप समजू शकले नाही. मुंबईतील के११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचा तो मालक होता. टायगरसोबतच तो इतरही बॉलिवूड सेलिब्रिटींचा फिटनेस प्रशिक्षक होता. कैझादच्या निधनानंतर टायगरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली. चित्रपटाच्या सेटवर काम करतानाही टायगर कधीच वर्कआऊट करणं विसरत नाही किंवा टाळत नाही. कैझादची त्याला खूप साथ दिली होती.

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, याबद्दल कैझाद एका मुलाखतीत म्हणाला होता, “माझ्यासाठी, माझी फी भरण्यास तयार असणारी कोणतीही व्यक्ती ही सेलिब्रिटीच आहे. सेलिब्रिटी, अभिनेते, अभिनेत्री, मॉडेल्स यांच्यासोबत काम करताना माझ्यासमोर फार काही आव्हानं नसतात. फिट नसेल तर सेलिब्रिटीलासुद्धा काम मिळत नाही. त्यामुळे ते अत्यंत शिस्तबद्ध असतात. त्यांचा आहार आणि व्यायामाच्या वेळापत्रकाबाबत नियोजन मी करतो.”

हेही वाचा: अफेअरच्या चर्चांवर समंथाच्या स्टायलिस्टचा खुलासा

टायगरचे पुढील प्रोजेक्ट्स

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बागी ३’ या चित्रपटात टायगरने भूमिका साकारली होती. सध्या तो ‘हिरोपंती २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात तारा सुतारिया टायगरसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘बागी ४’ आणि ‘गणपत’ हे दोन चित्रपट प्रतीक्षेत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here