ऑक्टोबर महिन्यात ना जास्त उष्णता असते, ना थंडी… हा महिना सुरू होताच शरद ऋतूतील निसर्गाच्या अनेक छटा अनुभवता येतात. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फिरायची हौस असणाऱ्यांसाठी हा हंगाम सर्वोत्तम आहे. या काळात तुम्ही साहसी सहलींना देखील जाऊ शकता..

हॉट एअर बलून राइडचा (Hot Air Balloon Ride) रोमांच अनुभवनं हा परदेशी पर्यटकांप्रमाणेच देशांतर्गत पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. उंचीवरुन निसर्ग न्याहाळण्याचा आनंद हॉट एअर बलूनच्या माध्यमातून घेता येतो. आज आपण पाहूया, हॉट एअर बलूनचा आनंद घेण्यासाठी आपण नेमकं कुठं जाऊ शकतो.

हेही वाचा: बंजी जंपिग करायचंय? या ठिकाणांना भेट द्या

हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशातील ‘मनाली’ हे हॉट एअर बलून राइडसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जर ही राइड तुम्ही संध्याकाळच्या वेळी करत असाल, तर ती अधिक मजेदार बनते. सूर्यास्तावेळी उंचावरून डोंगरदऱ्या न्याहाळण्याचा स्वर्गीय अनुभव तुम्ही येथे घेऊ शकता. साधारणपणे एक तासाच्या काळातील ही राइड संस्मरणीय ठरणार हे नक्की.

महाराष्ट्र – सह्याद्रीच्या डोंगररांगाचं वरदान लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातही तुम्ही या राइडचा आनंद लुटू शकता. ही राईड लोणावळ्यात उपलब्ध आहे. तब्बल ४००० फूट उंचीवरुन निसर्ग अनुभवण्याचा आनंद निराळाच. जंगलापलीकडच्या शहरातील उंच-उंच इमारतीचं दृश्यही इथून अनुभवता येतं.

हिमाचल प्रदेश हॉट एअर बलून राइड

हिमाचल प्रदेश हॉट एअर बलून राइड

हेही वाचा: दसऱ्याच्या 6 दिवसांच्या सुट्टीत ‘या’ 10 ठिकाणी प्लॅन करा सहल

गोवा – गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरुन हॉट एअर बलून राइडचा आनंद लुटणे हा एक सुखद अनुभव होऊ शकतो. बलून राइडसाठी हा महिना उत्तम आहे. किनाऱ्यापासून उंच जाऊन समुद्राच्या लाटांना पाहणं निश्चितच मनाला प्रसन्न करेल.

दिल्ली एनसीआर येथेही तुम्ही या राइडचा आनंद घेऊ शकता. फरीदाबाद शहराजवळील दमदमा तलावावर तुम्ही या रोमांचकारी सवारीचा आनंद घेऊ शकता. आपण येथे बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

गोवा हॉट एअर बलून राइड

गोवा हॉट एअर बलून राइड

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here