डोंबिवली : कल्याण (kalyan) शीळ मार्गाला जोडणारा महत्वाचा पूल म्हणजे देसाई खाडी वरील पूल आहे. या खाडीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू असून या नव्या पुलावर 16 ते 20 ऑक्टोबर (October) दरम्यान सिमेंटचे गर्डर बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण फाटा ते कल्याण या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

मुंबई
लोढा-पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पुल बांधण्याचे काम सुरू आहे. कल्याण फाटया कडून कल्याण कडे जाणाऱ्या वाहीनीवर पलावा जंक्शन येथे मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक विभागात बदल करण्यात आले असल्याची अधिसूचना वाहतूक शाखा ठाणे यांनी काढली आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा: कर्मयोगी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी
– कल्याण फाटयाकडून – कल्याण कडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला असुन सदरची वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोल नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
– कल्याण कडून कल्याण फाटयाकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना बदलापुर चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला असुन सदरची वाहने बदलापुर चौक-खोणी नाका-तळोजा एम.आय.डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.
Esakal