कॉमन फ्रेंडमुळे, ऑफिसात एकत्र काम केल्याने अनेकजण आपल्या संपर्कात येत असतात. त्यापैकी काही जणांशी रॅपो जमतो. तर काही जणांशी नाही. मात्र रॅपो जमलेल्यांशी तुमच्या मस्त गप्पा रंगतात. काही आवडी- निवडी जुळतात. त्यामुळे मैत्री अधिक खुलते. पण या ग्रुपमधल्या तिला आणि त्याला एकमेकांबद्दल स्पेशल फिलिंग यायला लागले. त्याच्याशी-तिच्याशी फोनवर बोलावं सतत असं वाटायला लागतं. हे फिलिंग स्पेशल आहे हे कळल्यावर त आणखीच वेगळं वाटायला लागतं. तुम्ही त्याच्या-तिच्याबरोबर रिलेशनशीप ठेवण्याबाबत सिरियस असाल तर अजिबात वेळ दवडू नका, भेटा एकमेकांना, जाणून घ्या दोघांविषयी. पण पहिल्यांदाच जर अशाप्रकारे डेटवर जाणार असाल तर गोंधळ उडणे साहजिक आहे. अशावेळी तिथे गेल्यावर काय बोलावं हेच सुचेनासे होईल. तुमच्यातला संवाद ती संध्याकाळ मेमोरेबल होण्यासाठी सध्या फक्त एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यावर भर द्या. तरीही हे कसं जाणून घ्यायचं असा प्रश्न पडला असेल तर, या टिप्स फॉलो करा.

प्रेम

प्रेम

स्वतःविषयी बोला

हा वेळ तुमच्या दोघांचा असणार आहे. या भेटीतून तुम्हाला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचे असेल तर विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी तयार रहा. तुमची पार्श्वभूमी कशी आहे, हे जाणवून द्या. अगाच उथळ, मजेशीर गोष्टींबाबत बोलणे शक्यतो टाळा.

तुमच्या महत्वाकांक्षा सांगा

तुमच्या आयुष्यातील महत्वाकांक्षा, उद्दीष्टे काय आहेत यावर चर्चा करून पहिली भेट मनोरंजक करा. मात्र या गोष्टी सांगताना मुलीला पैसे, स्टेटस आणि भौतिक गोष्टींनी इंप्रेस करणे टाळा. काही जण बहुतेकवेळा त्यांच्या करिअरविषयी बोलतात. पण त्यापेक्षा तुमच्या कामाबाबत बोला. जे पुरूष आयुष्यात काही ध्येय ठरवतात, असे पुरूष स्रियांना आवडतात.

हेही वाचा: कोरोनामुळे तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय का?

खाण्याची आवड

प्रत्येकाची खाण्याची आवड वेगवेगळी असल्याने त्याचे त्याबद्दल एक मत असते. एकत्र जेवताना त्याबद्दल जाणून घअया, चर्चा करा. त्यांची पार्श्वभूमी, ते मुळचे कुठचे या विषयावर चर्चा करताना तिथल्या अन्नपदार्थांबद्दल जाणून घ्या. दोघांमध्ये याविषयी खूप मोकळेपणाने चर्चा रंगू शकते. त्यामुळे एकमेकांच्या कंपनीचा आनंद मिळण्यासाठी या गोष्टी महत्वाची भूमिका बजावतील.

चांगले संगीत हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते

चांगले संगीत हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते

संगीताचे बोलणे

प्रत्येकाची संगीताची आवड वेगवेगळी असू शकते. पहिल्या डेटवर एकमेकांना जाणून घ्यायचे असेल तर संगीत हा उत्तम विषय आहे. संगीताबद्दल बोलण तसं सोपं आहे, लोक खुलून त्याविषयी बोलू शकतात. कारण प्रत्येकाचा आवडता संगीतकार, गायक, गाणी असतात. आणि त्याविषयी बोलताना व्यक्ती खुलून बोलतो. त्यामुळे संभाषण खुलविण्यासाठी संगीताचा आधार घ्याच.

हेही वाचा: झूम : हाताळण्यास सुलभ ‘ज्युपिटर १२५’

ट्रीप विषयी चर्चा करा

प्रत्येकाच्या प्रवासाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. काहींना एकटे तर काहींना मित्र-मैत्रीणींसोबत फिरायला जायला अतिशय आवडते. तुमच्या आवडत्या पर्यटनस्थळांबाबत तुम्ही डेटवर असताना फार चांगला संवाद साधू शकता. तुम्ही प्रवासाच्या कल्पनेविषयी मनमोकळेपणाने चर्चा केलीत तर तुमचा पार्टनर तुमच्यासारखाच प्रवासाविषयी विचार करणारा असे जाणवेल. तुमच्या या आवडी जुळल्या तर दुसरी डेट त्याच्यासोबत आखताना तुम्ही एकत्र ट्रीप ला जायचा विचार करू शकता.

पिच्चर आणि टिव्ही शॉज

याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या आवडत्या चित्रपट आणि टिव्ही शोविषयी चर्चा करू शकता. पार्टनरला कोणत्या प्रकारचे चित्रपट, दिग्दर्शक, कोणता जॉनर आवडतो, याबद्दल तुम्ही बोलू शकता. या संभाषणामुळे तुम्हाला एकमेकांची मत जाणून घ्यायला आवडतात, हे दोघांना अधोरेखित होईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here