भारतीय संघ सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडिया T20 World Cup खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे सांगितलं जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपला कार्यकाळ वाढवू नये अशी विनंती त्यांनी BCCI ला केली आहे. असं असताना नव्या कोचची निवड होईपर्यंत भारताचा माजी खेळाडू टीम इंडियाला मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: Video: ‘गब्बर’चा सुनील नारायणला दणका.. दोन चेंडूत दोन सिक्सर
टी२० विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर भारताचा न्यूझीलंड विरूद्धचा दौरा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या हंगामी प्रशिक्षक पदासाठी माजी क्रिकेटपटू भारताची भिंत (The Wall) राहुल द्रविड याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाला टीम इंडियाच्या हंगामी प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांनाच नियुक्त करायचं आहे अशी चर्चा आहे.
हेही वाचा: IPL 2021: KKR ने केली ‘दिल्ली’ काबीज; CSK शी खेळणार फायनल!

रवी-शास्त्री-राहुल-द्रविड
हेही वाचा: फॅन्सनी ‘लॉर्ड ठाकूर’ म्हटल्यावर कसं वाटतं? शार्दूल म्हणतो..
टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर केवळ विराट कोहली आणि रवी शास्त्रीच आपापल्या पदावरून पायउतार होणार नाहीयेत तर शास्त्रींचा सपोर्ट स्टाफदेखील आपापली पदे सोडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफसाठीही काही शिफारशी आल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट बोर्डाला नियमानुसार नव्या नियुक्त्या करण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे या नियुक्ती होण्याच्या आधी होणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी द्रविडला हंगामी प्रशिक्षक करावं अशी BCCIच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
हेही वाचा: T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची ‘टीम इंडिया’मध्ये एन्ट्री!!
“भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य कोच पदासाठी जे अर्ज येतील त्या अर्जांवर विचार केला जाईल. पण भारतीय क्रिकेटला साजेसे अर्ज येणं अपेक्षित आहे. जोवर भारतीय संघाला चांगला पर्याय मिळत नाही, तोपर्यंत राहुल द्रविडला हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याचा विचार सुरू आहे”, अशी माहिती BCCI शी संबंधित सूत्रांनी दिली.
Esakal