नागपूर : आपल्या आहारात विविध धान्य आणि कडधान्यांचा समावेश असतो. धान्यांच्या सेवनाचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. मात्र, धान्य निवडतानाही काळजी घ्यायला हवी.

पॉलिश किंवा रिफाइंड धान्यापेक्षा पॉलिश न केलेले धान्य वापरणे लाभदायी ठरते. धान्यावर प्रक्रिया करताना पोषक घटक नष्ट होतात.
चवळी हे ग्लुटेन विरहित धान्य मानले जाते. ग्लुटेनमुळे शरीरातले ग्लुकोजचे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढते. गव्हात ग्लुटेन असते. याची ॲलर्जी असणाऱ्यांसाठी चवळी लाभदायी धान्य आहे.
बाजरीच्या सेवनाने शरीराची मॅग्नेशिअमची गरज भागू शकते. शरीरात इन्शुलिनची निर्मिती करणारी रसायने बाजरीमुळे कार्यरत होतात. बाजरीमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तसेच मधुमेहही नियंत्रणात राहतो.
क्विनोआ नावाचे धान्यही मधुमेह नियंत्रणात लाभदायी ठरते. यात प्रथिने, कॅल्शिअम, लोह, मॅगनीज, तांब, फॉस्फरस असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here