जर तुम्हाला युरोपला जायचं असेल; पण जवळ पैसे ​​नसतील, तर निराश होण्याची काही गरज नाही. तुम्ही कमी पैशात कूर्गला जावू शकता. हे ठिकाण युरोपियन हिल स्टेशनपेक्षा काही कमी नाही. म्हणून, याला भारताचं स्कॉटलंड देखील म्हणतात.

जर तुम्हाला युरोपला जायचं असेल; पण जवळ पैसे ​​नसतील, तर निराश होण्याची काही गरज नाही. तुम्ही कमी पैशात कूर्गला जावू शकता. हे ठिकाण युरोपियन हिल स्टेशनपेक्षा काही कमी नाही. म्हणून, याला भारताचं स्कॉटलंड देखील म्हणतात. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या मैदानावर वसलेल्या या सुंदर हिल स्टेशनला भेट देतात.
कर्नाटकातील कुर्गचे (Karnataka Coorg) अधिकृत नाव कोडगु (Kodagu District) असं आहे. हे ठिकाण देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे आपण ट्रेकिंग, फिशिंग आणि व्हाइट वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
कूर्ग हे कर्नाटकातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं ठिकाण आहे. कूर्गला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मे असं आहे, परंतु पावसाळ्यात त्याचे सौंदर्य आणखी खुलते.
भारताचा हा प्रदेश सर्वात जास्त कॉफी उत्पादक आहे. कूर्ग देशातील अतिवृष्टी असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. कर्नाटकातील या हिल स्टेशनवर तुम्हाला हिरव्या दऱ्या, चहाच्या बागा, कॉफीची झाडे आणि नारंगी फळबागा दिसतील.
कूर्गमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. ज्यात भगमंडला, तालकावेरी, निसर्ग धाम, दुबेरे, अब्बे वॉटर फॉल, इरुप्पू वॉटर फॉल आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. पुष्पगिरी आणि ब्रह्मगिरी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे याला भारताचे ‘स्कॉटलंड’ असेही म्हणतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here