दसरा उद्याच आहे. अनेकांना सुट्टी आहे. परवा तिसरा शनिवार असला तरी त्यादिवशी सुट्टी घेतली तर सलग तीन दिवस मिळू शकतात. या दिवसात ट्रीप करायची असेल तर मुंबई, पुण्याजवळ अशी चांगली ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही विकेंड ट्रीप प्लॅन करू शकता.

murud-janjira.jpg
मुरुड जंजिरा
मुरुड- जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.मुंबईपासून 140 तर पुण्यापासून 160 किमीवर असलेला मुरूड- जंजिरा किल्ला अभेद्य असा आहे. मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. तसेच राजपुरीहून किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. येथे राहण्यासाटी मुरूडमध्ये बरीच हॉटेल्स आहेत. याशिवाय मुरूडचा समुद्रकिनाराही बघण्यासारखा आहे.
हेही वाचा: PHOTO : भारताचं ‘स्कॉटलंड’ माहितीय? मग, तुम्हाला कर्नाटकात जावचं लागेल

लोणावळा
लोणावळा- खंडाळा
सध्या कमी -अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. वातावरणात बऱ्यापैकी गारवा आहे. अशावेळी जर अगदी पटकन प्लॅन ठरला तर लोणावळा-खंडाळा बेस्ट पर्याय आहे.

माथेरानची राणी म्हणून ओळख असणाऱ्या टॉय ट्रेनने प्रवास करणे पर्यटकांना नेहमीच आवडतं.
माथेरान
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाते. २६०० फूट उंचीच्या पठरावर माथेरान वसलेले आहे मुंबईपासून ८० कि.मी आणि पुण्यापासून १२६ कि.मी आहे.एका दिवसात येथील अनेक पॉईंट्सना भेट देता येते. जर राहायचे असेल तर अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

महाबळेश्वर – वेण्णा लेक परिसरात घोडेस्वारीचा आनंद घेता येतो.
महाबळेश्वर
पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर मुंबईपासून २३० कि.मी तर पुण्यापासून १२० कि.मी अंतरावर आहे. सध्या येथील वातावरण थंड आहे. त्यामुळे येथे जाण्यास पर्यटक कायम तयार असतात. स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झााला की येथे भेट देण्याऱयांची संख्या वाढते.

माळशेज घाट :
ट्रेंकिंग डेस्टिनेशन नावाने ओळख असलेली माळशेज घाट हा खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इथे जाऊ शकता. माळशेज घाट हा परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो.
माळशेज घाट
धबधब्यात भिजायचे असेल, हिरवा निसर्ग पाहायचा असेल तर माळशेज घाट उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, हायकिंगही करू शकता.
हेही वाचा: भारतातील सर्वोत्तम १० हॉटेल्स कोणते? पाहा फोटो

पवना लेक
पवना लेक हे निसर्गरम्य ठिकाण आहे. मुंबईपासून 190 तर पुण्यापासून 54 किमी अंतरावर पवना लेक आहे. इथे टेन्टम्ये निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेता येतो. मित्र-मैत्रीणींबरोबर, फॅमिलीबरोबर चांगला वेळ घालवायचा असेल तर येथे नक्की भेट द्या.
Esakal