रेंजहिल्स : भारताचे माजी राष्ट्रपती कै. एपीजे अब्दुल कलाम यांच्या या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन शिवाजीनगर येथील पी .ई. एस . मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी ज्ञान समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनानुसारकार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

यानिमित्त ऑनलाइन व ऑफलाईन कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी विद्यार्थिनींसाठी घोषवाक्य स्पर्धा, डॉ. ए पी ्जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, वाचनाचे महत्त्व विशद करणारी निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले .

या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शाला समिती अध्यक्ष पल्लवी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनींना पुस्तके देण्यात आली. विद्यार्थिनींनी वाचन केलेल्या या पुस्तकांचे परीक्षण करून पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पवार, उपमुख्याध्यापिका डॉ. उज्ज्वला हातागळे,पर्यवेक्षिका अनिता बसाळे , शिक्षिका प्रतिनिधी अनिता नाईक,सांस्कृतिक प्रमुख पुष्पा रामटेके, ग्रंथपाल हर्षदा वाड व संगीता काटे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह शामकांत देशमुख व शालासमितीचे पदाधिकारी उद्धव खरे यांनी मार्गदर्शन केले व मुलींशी संवाद साधून कार्यक्रमाचे कौतुक केले .

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here