मुंबई : दादरमधील (dadar) ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (chhatrapati shivaji maharaj statue) तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई (electric decoration) करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते आज करण्यात आले.
हेही वाचा: रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात
उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन ही केले गेले. मैदान परिसरातील रंगी बेरंगी विद्युत रोषणाईची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
विद्युत रोषणाईची वैशिष्ट्य
मुख्यमंत्री आमदार निधीतून सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे.
• ही रोषणाई कायमस्वरुपी तसेच स्वयंचलित व विविधरंगी स्वरुपाची आहे.
• अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.
• पुतळ्याच्या पदपीठावर विविध रंग बदलणारे एलईडी वॉल वॉशर दिवे लावले आहेत.
• पुतळ्याच्या आजुबाजूस असलेल्या उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
• बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत.
• मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ बोलार्डस (छोटेखानी खांब) लावले आहेत.
Esakal