जळगावः दक्षिण आशियातील हिंदी महासागराच्या उत्तर भागात समुद्राच्या बेटावर श्रीलंका देश हा आहे. हा देश छोटासा असला तरी येथे निसर्गाचे अदभूत नजारे तुम्हाला पाहायला मिळाले. येथे फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. जेथे तुम्ही सुट्ट्यांचे नियोजन करू शकतात. चला तर जाणून घेवू या देशाबद्दल..

श्रीलंका देशाला रामायणाचा इतिहास

रामायण काळात श्रीलंकेत रावणाचे साम्राज्य होते तसेच, त्या वेळी श्रीलंकेचे नाव लंका होते. म्हणून रावण साम्राज्याचे अनेक खूना येथे आज ही आढळतात. तुम्हाला श्रीलंकेत काही रहस्यमय आणि ऐतिहासिक ठिकाण असून जेथे तुम्ही भेट देवून शकतात.

मिंटेल प्लेस

श्रीलंका देशात सर्वात सुंदर व प्रसिध्द ठिकाणांमध्ये मिंटेल हे ठिकाण आहे. हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नसून बौद्ध समुदायाशी संबंधित आहे. या स्थळाबद्दल अनेक गोष्टी असून यात बौद्ध भिक्खू महिंदा येथे राजा देवनाम्प्यतीसा यांना भेटले. राजाचा बौद्ध भिक्षूवर खूप प्रभाव पडला आणि त्याने युद्धाचा त्याग करून शांतता प्रस्थापित केली असे म्हणतले जाते.

उनावतुना

श्रीलंकेतील प्रसिध्द स्थळांमध्ये उनावतुना हे देखील पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हे श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. जे पर्यटकांसाठी सहलीचे ठिकाण आहे. येथे सुंदर निसर्गरम्य ठिकाणे असून किनाऱ्यावर रंगीबेरंगी मासे देखील पाहण्यास मिळेल. तसेच येथे स्वादिष्ट भोजनाचा देखील आनंद घेता येईल.

गल विहार

गाल विहार हे श्रीलंकेतील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असून हे प्राचीन पोलोन्नारुवा शहरात आहे. बौद्ध धर्माशी निगडित हे प्रसिद्ध ठिकाण असून अनेक सुंदर शिल्प येथे आहे. तसेच येथे अदभूत लेण्या देखील तुम्हाला पाहायला मिळेल.

रावण धबधबा

श्रीलंका देशात रावणाच्या नावाचा धबधबा असून हे ठिकाण श्रीलंकेतील सर्वोत्तम ठिकाणांमध्ये आहे. त्याचे सौंदर्य अदभूत असून पर्यटकांसाठी खास आकर्षकाचे ठिकाण हे आहे. या सुंदर धबधब्यांजवळ हिरवीगार झाडे हे ठिकाण अधिक आकर्षक बनते.

मिरीस बीच

तुम्हाला पार्टी करायला आवडत असेल तर मिरीस बीच श्रीलंकेतील सर्वोत्तम ठिकाण आहे. मिरीस बीच श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे मिंत्रासह, तुमच्या जोडीदारा सोबत तुम्ही येवू शकतात. तसेच तुम्हाला व्हेल पाहणे, स्नॉर्कलिंग आणि सर्फिंग सारखे उपक्रम देखील करू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here