भुवनेश्वरः कधी कधी जगात अशा काही घटना घडतात की ज्यावर आपला विश्वासच बसत नाही. अशीच एक विचित्र घटना घडली आहे ओडिशाच्या नवरंगपूर जिल्ह्यातील कुमुली जवळील विजापूर गावात. त्याचं झालं असं की, येथील धनीराम नावाच्या शेतकऱ्याच्या गाईनं अशा वासराला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या वासराला दोन डोकी आणि तीन डोळे आहेत. नवरात्री दरम्यान जन्माला आलेले हे वासरु सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या वासराबद्दल माहिती मिळताच स्थानिकांनी दुर्गामातेचा अवतार म्हणून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: कसली गोडयं! फ्लाईटमध्ये झाली बापलेकीची भेट, पाहा व्हिडिओ

धनीरामने दोन वर्षांपूर्वी गाय विकत घेतली होती आणि नुकतीच ती व्याली. यादरम्यान तिला त्रास होत असल्याचे धनीरामला जाणवलं. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की जन्माला आलेल्या वासराला दोन डोकी आणि तीन डोळे आहेत. हे पाहून धनीराम आणि कुटूंबीय आश्चर्यचकीत झाले. सध्या या वासराला गाईचे दूध पिण्यास त्रास होत असून धनीरामचे कुटूंबीय दूध विकत आणून त्याला पाजत आहेत..

हेही वाचा: पर्यावरणासाठी जगतवारी करणारा ‘सायकलबाबा’ आहे तरी कोण?

असं असलं तरी नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जन्मलेल्या या अनोख्या वासराची लोकांनी आई दुर्गेचा अवतार म्हणून पुजा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडीयो सोशल मिडीयामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here