जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तेही अशी ठिकाणी जेथे तुम्ही संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवू शकाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, यूकेच्या ऑनलाइन मॉर्गेज एडवाइजरने केलेल्या नवीन अभ्यासात भारतातील विविध शहरांशी संबंधित बरीच रोचक माहिती समोर आली आहे. घर खरेदी करण्याच्या दृष्टीने जगभरातील सर्वात आनंदी शहरांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार जगातील पहिल्या २० शहरांमध्ये भारतातील पाच शहरांचा समावेश आहे.

घर खरेदी करण्याच्या दृष्टीने भारतातील सर्वात जास्त आनंदी शहरे कोणती आहेत, हे आज आपण पाहणार आहोत….
या अभ्यासानुसार भारतातील शहरांच्या क्रमवारीत चंदिगड पहिल्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगातील सर्वात आनंदी शहरांच्या क्रमवारीत खालून पहिल्या तर सुरत पाचव्या स्थानावर आहे.

स्पेनमधील बार्सिलोना हे घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात आनंदी शहर असल्याचे दिसून आले. इटलीतील फ्लॉरेन्स दुसऱ्या क्रमांकावर तर दक्षिण कोरियातील उल्सान शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हजारो इन्स्टाग्राम पोस्ट्स आणि लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचं विश्लेषण यावरून आनंदी शहरांची ही यादी तयार करण्यात आली आहे …

या अभ्यासात दिसून आले की, बार्सिलोनामध्ये घर खरेदी करणाऱ्यांचा सरासरी हॅपीनेस स्कोअर १०० पैकी ९५.४ आहे, जे घर खरेदीदारांच्या जागतिक हॅपीनेस स्कोअरच्या सरासरीपेक्षा १५.६ % जास्त होते …


घर खरेदी करण्यासाठी चंदीगड हे भारतातील सर्वात आनंदी शहर असल्याचे दिसून आले. जागतिक क्रमवारीत चदीगडला पाचवं स्थान प्राप्त झालंय.

भारतातील उर्वरित २० शहरांमध्ये जयपूर १० व्या, चेन्नई १३ व्या आणि इंदौर आणि लखनऊ अनुक्रमे १७ व्या आणि २० व्या स्थानावर आहेत. जे या जागतिक यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

अभ्यासानुसार, घर खरेदी करण्यासाठी मुंबई हे जगातील सर्वात कमी आनंदी शहर आहे. मुंबईचा सरासरी हॅपीनेस स्कोअर १०० पैकी ६८.४ होता. हे घर खरेदीदारांच्या जागतिक आनंदाच्या स्कोअरपेक्षा १७.१% कमी होते.
मुंबईखालोखाल या यादीत अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुंबई व्यतिरिक्त भारतातील सुरत शहर हे जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

हॅपीनेस स्कोअर असा मोजला गेला-
हा अभ्यास ऑगस्ट २०२१ मध्ये जगभरातील हजारो जिओ-टॅगिंग इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे करण्यात आला. या पोस्ट्समधील टॅग असलेल्या चेहऱ्यांपैकी अलीकडील घर खरेदीदारांच्या आनंदाची पातळी सामान्य इन्स्टाग्राम वापरकर्त्याच्या तुलनेत कशी आहे याचा अभ्यास केला गेला. या अभ्यासासाठी छायाचित्रांचे दोन संच तयार करण्यात आले.

एक सेल्फी हॅशटॅगसह पोस्ट केला आणि दुसरा न्यू होम ओनर हॅशटॅगसह पोस्ट केला गेला. पोस्टमध्ये टॅग केलेले हे चेहरे मायक्रोसॉफ्ट अझ्यूर फेशियल रिकग्निशन टूल वापरून स्कॅन करून गुण शोधले गेले आणि त्यावरुन हा अभ्यास केला गेला.

Esakal