अश्विन शुद्ध दशमीचा दिवस म्हणजे विजयादशमी- दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला धटांची स्थापना केल्यावर देवीचे नवरात्र साजरे केले जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. या सणाला धन, ज्ञान व भक्तीची पूजा केली जाते.त्याचेच प्रतिक म्हणून दस-याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे. तसेच पाटी पूजन अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते.

दसरा सण

दसरा सण

अशी आहे आख्यायिका

ह्या प्रथेमागे गुरुदक्षिणा देणा-या शिष्य कौत्स व त्यांचे गुरुवर्य ऋषी त्यांच्या गुरुदक्षिणावर आधारित कथा सांगितली जाते तर, दसर्‍याच्या आधी नवरात्रात देवीच्या शक्तीरुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला होता. म्हणून विजयाचा दृष्टीकोन समोर ठेवून या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध दसऱ्याच्या दिवशी केला होता. यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते.त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. म्हणूनच या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात, असे म्हटले जाते.

आपट्याच्या पानांचे महत्व

बौहिनिया रेसीमोसा असे आपटयाचे शास्त्रीय नाव आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना न देता ती आपल्या घरात ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित आ8े.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here