राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. नागपूरमध्ये यंदाचा हा सोहळा मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘शस्त्र पूजा’ केली आहे. मोहन भागवत यांनी अनेक बाबींवर भाष्य केलंय. स्व आपण विसरुन चाललो असून आपण त्याची जागृती केली पाहिजे. आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. पुन्हा आपण विभाजित होऊ नये, यासाठी हा इतिहास आपल्याला माहिती हवा. दोन राज्यांतल्या संघर्षावरही त्यांनी बोट ठेवलंय. जग दुष्टांचं आहे. सामर्थ्याशिवाय ते सत्य स्वीकारत नाही.
हात उचलणाऱ्याचा हात राहूच नये इतकं सामर्थ्य हिंदू समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे – मोहन भागवतस्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. ‘स्व’चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.RSS स्थापना दिवस आणि विजयादशमी 2021च्या निमित्ताने बिचोलीम येथे आयोजि ‘पथ संचलन’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाग घेतला