नवी दिल्ली : भारतानं दुर्गा पूजेदरम्यान (Durga Festival) बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या (Bangladesh Violence) घटनेचा जाहीर निषेध नोंदवत नाराजी व्यक्ती केलीय. भारतानं म्हटलंय, की आम्ही भारतीय दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या घटनेची माहिती घेत आहोत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, बांगलादेश सरकारनं या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई केलीय, तर सरकारचंही यावर लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दुर्गा पूजेच्या ठिकाणी पवित्र ‘कुराण ग्रंथ’ ठेवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार उसळला. त्यानंतर दुर्गा पूजा पंडालोमध्ये Durga Puja Pandalo (मंदिर) तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. या घटनेचा निषेध नोंदवत भारतानं आपली भूमिका जाहीर केलीय. अरिंदम बागची म्हणाले, आम्ही बांगलादेशमधील धार्मिक कार्यक्रमावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला असून हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. सध्या बांगलादेश सरकार परिस्थिती हाताळत असून कायदेशीर यंत्रणा तैनात केलीय. या घटनेवर भारत सरकारचंही लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा: मुलगी झाली हो! आनंदाच्या भरात मालकानं ग्राहकांना दिलं Extra पेट्रोल

दुर्गा महोत्सव

दुर्गा महोत्सव

बागची पुढे म्हणाले, बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान काही धार्मिक स्थळांवर हल्लेखोरांनी हल्ले केलेत. ही आमच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. आम्ही बांगलादेश सरकारला हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केलीय. बांगलादेशात दुर्गा उत्सवावेळी काही अज्ञात बदमाशांनी हिंदू मंदिरांचेही मोठे नुकसान केले असून सरकारला 22 जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करावा लागलाय. या दंगलीत चार जण ठार झाले असून 60 जण जखमी झाल्याचे समजते.

हेही वाचा: गरबा बघून भावासोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here