मुंबई – मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्य़ा त्या क्रुझवर एनसीबीनं छापा टाकला. त्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आली. त्याच्यासह इतरांनीही पोलिसांनी अटक केली. मात्र बॉलीवूड स्टारचा मुलगा जाळ्यात सापडल्यानंतर बॉलीवूडमध्ये चर्चेला उधाण आले. काल त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. मात्र त्याला काही जामीन मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. आर्यनसह उद्योगविश्वातील मोठ्या हस्तींच्या मुलांचाही या प्रकरणात समावेश आहे. मात्र त्यात प्राधान्यक्रमानं आर्यनचं नाव समोर आलं आहे. यासगळ्यात शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. त्यानं आर्यनला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याला बॉलीवूडच्या त्याच्या सहकाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. सलमान खाननं आतापर्यत शाहरुखची दोन वेळा भेट घेतली आहे.

आर्यनच्या प्रकरणावर 20 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आणखी पाच दिवस कोठडीत राहावं लागणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं आर्यनच्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवत त्यावर 20 ऑक्टोबरला निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी आर्यनच्या जामीन याचिकेच्या विरोधात महाधिवक्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. त्यांनी हायकोर्टामध्ये गेलेल्या शौविक चक्रवर्तीच्या प्रकरणाचा दाखला दिला. त्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते. मात्र या प्रकरणामध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून आर्यन तुरुंगात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कैदी नंबर मिळाला असून तो N956 असा आहे. तुरुंगामध्ये कैद्यांना त्यांच्या नंबरवरुन बोलावले जाते.

न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार, आर्यनला तुरुंगातील सर्व नियम पाळावे लागतील. त्याला घरचे अन्न देता येणार नाही. जेलमध्ये इतर कैद्यांप्रमाणे राहावे लागेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबरला आर्यनला 4 हजार 500 रुपयांची मनीऑर्ड़र मिळाली होती. कैद्याला प्रत्येक महिन्याला 4 हजार 500 रुपयांची मनी ऑर्डर करण्याची मुभा आहे. कोर्टानं नोंदवलेल्या निरिक्षणामध्ये आरोपी आर्यन खान या प्रकरणातील महत्वाचा आरोपी आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे. न्यायालयात यापूर्वी असा युक्तिवाद करण्यात आला होता की, भलेही आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसेल मात्र त्याला त्याच्या सहकाऱ्यांकडे ड्रग्ज होते याची कल्पना होती. त्यानंही ड्रग्ज सेवन केले. ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी देखील त्यानं ड्रग्ज घेतलं आहे. असं एनसीबीच्यावतीनं सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा: Cruise Drugs Case; ‘आर्यन घेतोय नियमित ड्रग्ज, एक वर्षाची व्हावी शिक्षा’

हेही वाचा: आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं निर्णय ठेवला राखून

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here