मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपात खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंसोबतच तिने प्रत्येक देवीचं माहात्म्यसुद्धा सांगितलं आहे. पाहुयात नऊ देवींच्या अवतारातील अपूर्वाचे हे खास फोटो..

नवरात्रीचा पहिला दिवस, रंग – पिवळा. देवी- महालक्ष्मी (अंबाबाई) कोल्हापूर. कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते.
नवरात्रीचा दुसरा दिवस, रंग – हिरवा, देवी- मुंबादेवी. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे
नवरात्रीचा तिसरा दिवस, रंग – करडा, देवी- जया गौरी दुर्गा परमेश्वरी. जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी, चामुंडेश्वरी, ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंदपुराणात याचा उल्लेख आहे.
नवरात्रीचा चौथा दिवस, रंग – नारंगी, देवी- जगदंबा माता – राशिन. जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराचं बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
नवरात्रीचा पाचवा दिवस, रंग – पांढरा, देवी-बंगाली देवी, त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला.
नवरात्रीचा सहावा दिवस, रंग – लाल, देवी-एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.
नवरात्रीचा सातवा दिवस, रंग – निळा, देवी- चंद्रपूरची महाकाली. चंद्रपूरची आराध्यदैवत माता महाकाली हे गुफा मंदिर आहे. चंद्रपूर येथील महाकाली मंदिर गोंडकालीन असून याला वाकाटक कालाचाही संदर्भ आहे. महाकाली मंदिराच्या भिंतींवर शिल्पकलेहून तिबेटी आणि हिंदू परंपरेचे उत्कृष्ट मिश्रण दिसून येते. रंगीत चित्रकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
नवरात्रीचा आठवा दिवस, रंग – गुलाबी, देवी- सरस्वती. सरस्वती देवी ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे.
नवरात्रीचा नऊवा दिवस आणि दसरा, रंग – जांभळा, देवी- लक्ष्मी. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी आणि संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे.

Esakal

1 COMMENT

  1. Looking at this article, I miss the time when I didn’t wear a mask. baccaratcommunity Hopefully this corona will end soon. My blog is a blog that mainly posts pictures of daily life before Corona and landscapes at that time. If you want to remember that time again, please visit us.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here