मुंबई – दिल्ली – हरियाणा बॉर्डरवर सोनीपत जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेचे पडसाद तीव्रपणे सोशल मीडियावर उमटले आहेत. त्या बॉर्डरवर एका युवकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्या घटनेवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता त्या घटनेवर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं नेहमीप्रमाणे आपल्या परखड शैलीत ती प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा या घटनेमुळे संतप्त झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदारपणे आपला निषेध नोंदवला आहे. तो कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचा मृतदेह एका बॅरिकेडला बांधण्यात आल्याचे दिसुन आले होते. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. स्वरानं त्या घटनेला निंदनीय आणि लज्जास्पद म्हटले आहे. स्वराचं व्टिट व्हायरल झाले आहे. त्यावर अनेकांनी कमेंट दिली आहे. अशाप्रकारे कायदा हातात घेऊन कुणी काहीही करु शकत नाही. जे काही चालले आहे ते अतिशय लज्जास्पद आहे. चिंतनीय आहे. #FarmersProtest साठी दिलेलं बलिदान गंभीर आहे. #SinghuBorder लज्जास्पद असल्याचं स्वरानं केलेलं व्टिट अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मृताची ओळख पटली आहे. त्याचे नाव लखबीर सिंह असे आहे. तो पंजाबातील तरनतारन गावचा राहणारा आहे. त्याचे वय 35 वर्ष असून तो मोलमजूरी करणारा शेतकरी होता. त्याचे वडिल दर्शन सिंह यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी भलतेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातून अनेक हिंसक घटनाही घडल्या आहेत. त्याचे तीव्र पडसादही उमटले आहेत. अद्याप त्या कायद्यांविरोधात कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. सरकारनं त्यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सातत्यानं केली जातेय.

हेही वाचा: ‘तो’ सीन दिला तर त्यात चूक काय? स्वरा होतेय ट्रोल

हेही वाचा: पूजा, वास्तुशांती करणारी स्वरा होतेय ट्रोल; पाहा व्हिडिओ

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here