दसऱ्यानिमित्त मराठी कलाकारांनी पारंपारिक पेहराव करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पाहुयात त्यांचे खास फोटो..
रिंकूने पिवळ्या रंगाची आजीची साडी नेसली आहे. साडी आणि दागिने यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. प्रसाद ओक आणि मंजीरी ओक या दाम्पत्याने पारंपारिक पेहराव करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज‘इमली’ या मालिकेमुळे चर्चेत असलेल्या गश्मीर महाजनीने कुर्ता परिधान केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध भावेनेदेखील पत्नीसोबतचा फोटा शेअर केला आहे.दिल दोस्ती दुनियादारी फेम स्वानंदी टिकेकरने साध्या पण तितक्याच मोहक अंदाजात दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.रश्मी अनपटने सुरेख साडी आणि मराठमोळ्या साजात शुभेच्छा दिल्या आहेत.