झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने शांत झोप लागते. दुधामध्ये झोप वाढवणारे ट्रिप्टोफॅन असते. पण, शास्त्रज्ञांनी तणाव दूर करणारे आणि झोपही वाढवणारे दुधामधील पेप्टाइड्सचे एक मिश्रण देखील शोधले आहे. या मिश्रणाला केसिन ट्रिप्टिक हायड्रोलायझेट (CTH) असेही म्हणतात.
अमेरिकन केमिकल सोसायटी अॅग्रीकल्चर अॅन्ड फूड जर्नलमधील एका अहवालानुसार, संशोधकांनी CTH मध्ये नैसर्गिक झोप लागण्यासाठी उपाय म्हणून वापरता येतील, अशी विशिष्ट पेप्टाइड्स शोधली आहेत. रात्री नैसर्गिकरित्या चांगली झोप कशी घ्यावी? योग्य आहारापासून ते शारीरिक व्यायामापर्यंत सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
युएस सेंटर फॉर डिसी कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेनशन यांच्या मते, एक तृतीयांश अमेरिकी प्रौढांना पुरेशी झोप मिळत नाही. बेंझोडायझेपाइन आणि झोलपिडेम सारख्या निद्रानाश करणाऱ्या औषधांचे त्यांना व्यसन लागले आहे. अशा औषधांमधील GABA रिसेप्टर सक्रिय असल्यामुळे मज्जातंतूद्वारे संदेश पाठविणारी मेंदुमधील प्रथिनांवर परिणाम होतो.
शास्त्रज्ञांनी अनेक नैसर्गिक पेप्टाइड्स किंवा प्रथिनांचे छोटे भागदेखील शोधले आहेत जे GABA रिसेप्टरला निंयत्रित करतात, चिंता कमी करतात आणि झोप वाढवितात. उदाहरणार्थ, गाईच्या दुधातील प्रथिने, ज्याला केसिन म्हणतात आणि पाचक एन्झाइम ट्रिप्सिनचं मिश्रण. हे झोप वाढवणारे पेप्टाइड्सचे तयार करते ज्याला CTH म्हणतात.

या मिश्रणामध्ये एक विशिष्ट पेप्टाइड असते जे या परिणामासाठी कारणीभूत ठरू शकते. या पेप्टाईडला कॅसोझिपिन म्हणून देखील ओळखले जाते. संशोधनातील सहकारी लिन झेंग, मौमिंग झाओ यांना असे वाटत होते की, CTH मध्ये कदाचित झोप वाढवणारे अधिक प्रभावी पेप्टाइड्स सापडतील.
संशोधकांनी प्रथम माऊस स्लीप टेस्टमध्ये CTH आणि A-CZPच्या परिणामांची तुलना केली CTHने A-CZPपेक्षा झोप वाढवणारे गुणधर्म दिसून आले. त्यावरून CTHमध्ये A-CZPपेक्षा झोप वाढवणारे जास्त पेप्टाइड्स अस्तित्वात आहेत हे स्पष्ट झाले. त्यानंतर टीमने सिम्युलेटेड गॅस्ट्रिक डायझेशनदरम्यान CTHमधून बाहेर पडणारी बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स ओळखण्यासाठी मास स्पेक्ट्रोमेट्रीचा वापर केला आणि त्यांनी या पेप्टाइड्सचा GABA रिसेप्टरशी सहसंबंध तपासला. एकंदरीत CTH झोप वाढवू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Esakal