कोल्हापूर : कोल्हापुरात शाही दसऱ्याला (Kolhapur Shahi Dasara) एेतिहासिक परंपरा आहे. शमीच्या पानांचे पूजन केले जाते. इशाऱ्याच्या बंदुकीची फैरी झाडण्यात येतात यानंतर सोने लुटले (शमीची पाने) जाते. पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत आज ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला. परंपरेनुसार सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला. शहरातील दहा ठिकाणी स्क्रीनवरून आणि स्थानिक वाहिन्यांवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाले. याची सर्व क्षणचित्रे कॅमेरात कैद केली आहेत. सकाळचे छायाचित्रकार मोहन मेस्त्री यांनी.विजया दशमी दसऱ्यानिमित्त श्री अंबाबाईची विजयरथ रूपात पूजा बांधण्यात आली






Esakal