वाकड : परिसरात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी वाकड पोलिसांनी रणरागिणी पथकाची स्थापना केली असून या पथकासाठी विजया दशमीच्या मुहूर्तावर (ता १५) इलेक्ट्रिक बाईक प्रदान करून पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली.

भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या वतीने या पर्यावरण पूरक दुचाकी वाकड पोलिसांनी भेट देण्यात आल्या.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हिरवा झेंडा दाखवीत या रणरागिणी पथकाच्या दुचाकी पेट्रोलिंगचा शुभारंभ केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर,सहायक निरिक्षक अभिजित जाधव, संतोष पाटील, सपना देवतळे, संगीता गोडे, उद्योजक अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, अविनाश कलाटे, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, अशोक बावीसकर, सनी भुजबळ यांच्यासह भरोसा सेल व महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.

वाकड परिसरात गेल्या महिन्यात मॉर्निंग वोकला जाणाऱ्या महिलेवर हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवर वाकड पोलीस विविध उपाय योजना करीत आहे त्याच अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी रणरागिणी पथकाची स्थापना करण्यात आली शुक्रवारी त्यांना परिसरात गस्त घालण्यासाठी दुचाकीही प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दसऱ्याचे सोने वाटून शुभेच्छा दिल्या.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल चार तासांनी एन्ट्री मारली. वाकड मधील कार्यक्रमांसाठी त्यांनी सलग पाचव्यांदा उशिरा हजेरी लावली. त्यामुळे नाईलाजाने अनेकांना वाट पाहत बसावे लागले. पोलिसांच्या आग्रहाखातर अनेक महिला ओशाळून बसल्या. मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना घरच्या सणासुदीला देखील हजर राहता आले नाही.
Esakal