मुंबई – बॉलीवूडची ड्रीम गर्ल अशी हेमा मालिनी यांची ओळख आहे. त्या गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. 4 दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असणाऱ्या हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या जीवनपटाचा छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला आढावा. असं म्हटलं जातं की, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांचं फारसं कधी पटलं नाही. त्यांच्यातील वाद जगजाहीर होते. त्यांच्यात पॅच अप झालचं नाही.

राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यात त्यांच्यातील आणि राजेश खन्ना यांच्यातील ट्युनिंग फारसं जमलं नाही. ते वाद अखेरपर्यत कायम राहिले असेही सांगितलं गेलं.

असं बोललं जातं की, हेमा मालिनी यांनी कास्टिंग काऊच प्रकरणात सुपरस्टार राजेश खन्ना यांचे नाव घेतले होते. त्यावरुन मोठी खळबळ उडाली होती.

अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलताना हेमा म्हणाल्या, मी त्यांच्यासोबत 1971 मध्ये अंदाज केला. त्यावेळी मी नवीन होते. तेव्हाचे त्यांचे माझ्याबरोबरचे वागणे फारच वेगळे होते. ज्यामुळे भांबावून गेले होते.

एक सहकलााकार म्हणून जी वागणूक मी द्यायला हवी, तेवढीच मी देत होते. पण त्यामुळे सुपरस्टार राजेश खन्ना यांना ते आवडल नाही. असं मला वाटलं. तेव्हापासून त्यांच्या मनात माझ्याविषयी जी प्रतिमा झाली ती शेवटपर्यत गेली नाही.

राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांनी दहा पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. मात्र प्रत्येकवेळी या दोन्ही कलाकारांमधील ट्युनिंग आणखी गंभीर होते गेले. राजेश खन्नांना हेमा मालिनी गर्विष्ठ वाटायच्या.
Esakal