मनुष्य आपल्या जीवनात असा साथीदार शोधत असतो, जो आयुष्यभर आपल्यावरती प्रेम करेल, आपली काळजी घेईन. देशातील काही क्रीडा खेळाडुंना आपला जोडीदार त्याच क्षेत्रातील लाभला आहे. तर आज आपण भारतातील क्रीडा क्षेत्रामध्येच लग्र करणाऱ्या लव बर्डस बद्दल जाणून घेणार आहोत.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा ने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत २०१० या वर्षी आपला संसार थाटला.

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि पैलवान सत्यव्रत कादियान हे २०१७ ला लग्नबंधनात अडकले. पैलवान सत्यव्रत ने यूथ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

‘दंगल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट हिने भारत केसरी पैलवान विवेक सुहाग याच्याशी लग्नगाठ बांधली

भारतीय महिला कुस्तीची आयकॉन व ऑलिंपियन पैलवान गीता फोगट हीने 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86 किलो वजनी गटात ब्राँझ मेडल विजेता पैलवान पवन कुमार आपला विवाह रचला.

भारताची ‘फुलराणी’ बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. कश्यप ही जोडी लग्न बंधनात अडकली.

क्रिकेटर इशांत शर्माची बायको राष्ट्रीय बास्केट बॉल प्लेयर आहे.

दिनेश कार्तिकने स्क्वॉशपटू दीपिका हिच्यासोबत २०१४ साली विवाह केला. त्यांनी दोनवेळा एकमेकांशी विवाह केला. हिंदू आणि ख्रिस्ती रितीरिवाजांनुसार दोघेही विवाह बंधनात अडकले.
Esakal