कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच एका सदस्याची एन्ट्री झाली आहे. आदिश वैद्य (adish vaidya) हा वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये आला. आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. शिवाय सोशल मीडियावर त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

आदिशने कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकांमध्ये काम केले आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली.
सध्या तो बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच आदिशने इतर स्पर्धकांशी वाद ओढवून घेतला आहे.
आदिश त्याच्या लव्ह-लाईफमुळेदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आदिशची गर्लफ्रेंड रेवती ही देखील अभिनेत्री असून ती एक उत्तम कथ्थाक नृत्यांगनासुद्धा आहे.
आदिशने जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, गुम है किसीं के प्यार में, या मालिकांमध्येही काम केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here