ऑक्टोबर महिना सुरू आहे. पाऊस कमी अधिक प्रमाणात पडतोय. वातावरण सारखे बदलतेय. दिवसभर प्रचंड उकाडा तर रात्री थंड वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळतेय. वातावरणातील या बदलामुळे सध्या अनेकांना सर्दी खोकला झाल्याचे पाहायला मिळतंय. लॉकडाऊन उठवलेला असला तरी कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्दी खोकला झाला की पहिल्यांदा भिती वाटते ती कोरोना नसेल ना याची. अशावेळी घाबरून न जाता थोडा वेळ घ्या. गरम पाणी पिणे, काढा या गोष्टी चालूच ठेवाय. कोरोना काळात योगासनाचे महत्व खूप वाढले. या आसनांमुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. स्टॅमिना वाढतो. तसेच आजारांपासून दूर राहायला ही आसने तुम्हाला मदत करतात. तुम्ही सर्दी खोकल्यामुळे होणाऱया त्रासापासून ही चार आसने तुमची सुटका करू शकतात.

सोम योग (7) भासिका, अनुलोम विलोम अमृतक्रिया
भस्त्रिका
या प्राणायामात डाव्या हाताच्या अंगठ्याने जोरात हवा आत घेतली जाते व उजव्या नागपुडीने बाहेर फेकली जाते. हा प्रकार दहा वेळा करायचा. यावेळी डा्वया नाकपुडीने श्वास घेताना तुमचे पोट आता गेले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट पूर्वीप्रमाणेच दिसले पाहिजे. असे उजव्या नागपुडीनेही करावे. हा प्रकार केल्यान कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. गळ्याला सूज आलेली असेल तर ती कमी होते.

भुजंगासन
हे आसन करताना प्रथम पालथे झोपून हनुवटी छातीला आणि कपाळ जमिनीला टेकवायचे. हाताचे पंजे छातीजवळ आणून हाताच्या पंजावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचलायचा. कमरेखालचा भाग हलवायचा नाही. हे 10 ते 12 सेकंद करणे गरेजेचे आहे. या आसनात श्वास घेण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केल्यास फुफ्फुसांना बळकटी मिळू शकते. थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी कमी होते. दम्याचा त्रासही कमी होतो.

पवनमुक्तासन
हे आसन करताना पाठीवर झोपा. दोन्ही पाय जवळ ठेवा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. एक श्वास घेऊन तो सोडत अशताना उजवा गुडघा छातीपाशी घ्या. दोन्ही हाताचे पंजे एकमेकात गुंतवून गुडघा पोटावर दाबा.पुन्हा एकदा एक श्वास घेऊन तो सोडता सोडता डोके आणि छाती जमिनीपासून वर उचला व तुमच्या हनुवटीचा उजव्या गुडघ्याला स्पर्श करायचा.

वज्रासन
वज्रासन
वज्रासनाच्या पूर्वस्थितीत तुम्हाला दोन्ही पाय पसरुन बसायचे आणि दोन्ही हात नितंबाच्या बाजूला ठेवायचे. डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजवा पाय दुमडून घ्यायचा. त्याचप्रमाणे उजव्या हातावर भार घेऊन डावा हात दुमडून घेत नितंबाखाली पायांचे दोन्ही तळवे असावे. पायांचे तळवे हे आकाशाच्या दिशेने असावे आणि जमिनीशी समांतर असावेत. हे आसन केल्यामुळे तुमचे मन शांत राहील. सर्दी-खोकल्यामुळे झोपेवर परिणाम झाला असेल तर हे आसन केल्यावर ताण गेल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते.
Esakal