Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन हा त्यातील स्पर्धक आणि स्पर्धकांमधील जोरदार भांडण यांमुळे सतत चर्चेत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कधी मीरा जग्गनाथ-जय दुधाणे यांच्यात तर कधी आदिश वैद्य आणि सुरेखा कुडची यांच्यात बाचाबाची झाली. यावर आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा स्पर्धक पुष्कर जोग Pushkar Jog याने घरातील सदस्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. हा खेळ सन्मानाने खेळा. मारामाऱ्या, शिवीगाळ बरं नव्हे,’ असं त्याने म्हटलंय.

पुष्कर जोगाची पोस्ट-

‘महाराष्ट्र बघतोय.. सन्मानाने खेळा. मारामाऱ्या, शिवीगाळ हे बरं नव्हे. हे मराठी बिग बॉस आहे हे लक्षात ठेवा. आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतोय. घरात एक खरा माणूस शोधण्याचा प्रयत्न करतोय,’ असं त्याने लिहिलंय. पुष्करच्या या मताशी सहमत असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये पुष्कर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मेघा धाडे या सिझनची विजेती ठरली होती. तर पुष्करने दुसरं स्थान पटकावलं होतं. याआधीही पुष्करने बिग बॉसबाबत त्याची मतं मांडली आहेत.

हेही वाचा: BBM 3: विशाल-सोनालीवर चढतोय प्रेमाचा रंग; चाहत्यांना आवडतेय जोडी

बिग बॉस मराठी ३मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘करूया आता कल्ला’ या टास्कमध्ये सुरेखा ताईंनी आदिशला सुनावलं. त्यावरून आदिशला सुरेखा कुडची यांचा प्रचंड राग आला याबाबत तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मांडतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here