नागपूर : बदामामध्ये साखर नसल्यामुळे मधुमेही बदाम खाऊ शकतात. बदामामधील प्रतिरोधक हृदयाच्या कार्यावर परिणाम करून त्यात उपयुक्त सुधारणा करतात. त्यामुळे रक्तातील साखर शरीराबाहेर टाकली जाते. बदाम शरीरात इन्शुलीन प्रतिरोधक शक्तीला नियंत्रित करतो. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

बदामात नियंत्रित स्वरूपात उष्मांक असतो. बदामच्या सेवनाने शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण होत नाही. यातील फॅट्स आणि फायबरमुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते.
बदामामध्ये मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात पोषकतत्वांची निर्मिती होते. ही पोषकतत्त्वे दातांना व हाडांना मजबूत करतात.
बदामातील जीवनसत्त्वांमुळे अन्नपचन चांगल्या पद्धतीने होते. रोज एक ते दोन बदामांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुकर आणि नियंत्रित होते.
बदामातले घटक शरीरातील पचनतंत्रात बिघाड निर्माण करणाऱ्या हानिकारक जिवाणूंना नष्ट करण्याचे काम करतात. बदामाची साल आतड्यांच्या संप्रेरकांना नियमित व नियंत्रित स्वरूपात स्त्रवण्यास मदत करते.
बदामात गाम टोकोफेरॉलचे प्रमाण जास्त असते. हा घटक शरीरात कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट कस साहाय्यक ठरतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here