हरिश्‍चंद्रगड हा माझ्या अनुभवातील दुसरा ट्रेक. तसे मला रायगड ट्रेकमध्ये निसर्गाचे विविध पैलू अनुभवण्यास मिळाले. पण ज्या दिवशी मला कळले की पुढचा ट्रेक हरिश्‍चंद्रगड आहे. त्या चर्चेत कोकणकड्याचा आवर्जून उल्लेख होत होता. उत्कंठा तर शिगेला पोचली होती. त्यात आमच्या ट्रेकची तारीख पावसामुळे मागे-पुढे होत होती. एकदाची तारीख निश्‍चित झाली. रात्री ठीक 7.30 वाजता आम्ही 20 लोकांची टीम सोलापूरमधून निघालो. ट्रेकचे आयोजक गिर्यारोहक राजेंद्र डांगे सरांचे नियोजन अगदी उत्तम होते. पहाटे 4.30 च्या दरम्यान आम्ही हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावी पोचलो. सहा वाजता चहा-नाश्‍ता करून आम्ही गड चढाई चालू केली.

आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे आणखीनच नयनरम्य अनुभूती देणारा हरिश्‍चंद्रगड नजरेत सामावत नव्हता.

आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे आणखीनच नयनरम्य अनुभूती देणारा हरिश्‍चंद्रगड नजरेत सामावत नव्हता.

आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे आणखीनच नयनरम्य अनुभूती देणारा हरिश्‍चंद्रगड नजरेत सामावत नव्हता. जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, वाटेत लागणारे कारवी, करवंदाचे रान, सोबत करणारे नदी-नाले, उंच कडे, अवघड अजस्र खिंडी, क्षणोक्षणी आम्हाला रोमांचित करत होत्या. सतत पडणाऱ्या पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या होत्या. अद्‌भुत सौंदर्य डोळ्यात सामावून घेत असताना प्रत्येक पावलावरही नजर ठेवावी लागत होती. कारण, पाय घसरून पडण्याची भीती असायची. आमच्या सोबत सर्वात लहान ट्रेकर पण, लहान वयातच अनेक ट्रेकचा अनुभव घेतलेला अथर्व मदतीला यायचा. निसर्गसौंदर्याने नटलेल्या गडावर खास करून पावसाळ्यात गडभ्रमंती करण्यात वेगळाच अनुभव येतो. अंगावर येणारे दाट धुके, ढगांच्यावर डोके काढणारे डोंगर सुळके, घनदाट जंगल या सगळ्यांचा अनुभव घेतना मन अचंबित होत होते.

जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, वाटेत लागणारे कारवी, करवंदाचे रान, सोबत करणारे नदी-नाले, उंच कडे, अवघड अजस्र खिंडी, क्षणोक्षणी आम्हाला रोमांचित करत होत्या.

जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, वाटेत लागणारे कारवी, करवंदाचे रान, सोबत करणारे नदी-नाले, उंच कडे, अवघड अजस्र खिंडी, क्षणोक्षणी आम्हाला रोमांचित करत होत्या.

  हरिश्‍चंद्रगड पुणे, ठाणे, नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.

हरिश्‍चंद्रगड पुणे, ठाणे, नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.

सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्‍चंद्रगड आहे. हरिश्‍चंद्रगड पुणे, ठाणे, नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी रौद्रभीषण कडेकपारींनी नटलेला नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्‍चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. हरिश्‍चंद्र, तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्‍चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 4670 फूट एवढी आहे.

धुक्‍यामुळे कोकणकडा तरी नीटसा दिसत नव्हता. माझ्या जीवनातील हा सर्वात सुंदर आणि रौद्र या दोन्ही रसाचा मिलाफ. जणू शिवाचे दर्शन झाल्याचा प्रत्यय आला.

धुक्‍यामुळे कोकणकडा तरी नीटसा दिसत नव्हता. माझ्या जीवनातील हा सर्वात सुंदर आणि रौद्र या दोन्ही रसाचा मिलाफ. जणू शिवाचे दर्शन झाल्याचा प्रत्यय आला.

गडावरचे सृष्टीसौंदर्य नजरेत सामावत आम्ही गड चढत होतो. आजूबाजूचे डोंगर जणू काही गर्दी करून उभे आहेत आणि आमची मजा बघत आहेत. ते उंच डोंगर, खोल दऱ्या आणि सर्वत्र हिरवळ सारं काही अद्‌भुत होतं. सर्वजण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे ती अवघड चढण चढत होतो. चढ संपल्यावर काही वेळातच सर्वजण ज्या उत्सुकतेने इथे आलो होतो तो कोकण कडा आला आणि सर्वजण भारावून गेले. काय ते निसर्गाचे रूप, केवढे विशाल मनमोहक आणि तेवढंच रौद्र तो घोंगावणारा वारा, पाऊस, समोर अनेक पर्वतरांगा… याचसाठी केला होता अट्टाहास असा अविर्भाव सर्वांच्या चेहऱ्यावर आला होता.

साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी रौद्रभीषण कडेकपारींनी नटलेला नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्‍चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे.

अंगावर येणारे दाट धुके, ढगांच्यावर डोके काढणारे डोंगर सुळके, घनदाट जंगल या सगळ्यांचा अनुभव घेतना मन अचंबित होत होते.

अंगावर येणारे दाट धुके, ढगांच्यावर डोके काढणारे डोंगर सुळके, घनदाट जंगल या सगळ्यांचा अनुभव घेतना मन अचंबित होत होते.

धुक्‍यामुळे कोकणकडा तरी नीटसा दिसत नव्हता. माझ्या जीवनातील हा सर्वात सुंदर आणि रौद्र या दोन्ही रसाचा मिलाफ. जणू शिवाचे दर्शन झाल्याचा प्रत्यय आला. गड उतरण करत आम्ही साधारण दीड-दोनच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी आलो. गावातच सर्वांनी भास्करकडे जेवण केले. थोडी विश्रांती घेऊन हरिश्‍चंद्रगडाच्या आठवणी घेऊन आपापल्या घराकडे रवाना झालो.

चढ संपल्यावर काही वेळातच सर्वजण ज्या उत्सुकतेने इथे आलो होतो तो कोकण कडा आला आणि सर्वजण भारावून गेले.

चढ संपल्यावर काही वेळातच सर्वजण ज्या उत्सुकतेने इथे आलो होतो तो कोकण कडा आला आणि सर्वजण भारावून गेले.

– वैशाली रवींद्र डोंबाळे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here