पिंपरी : नवरात्रोत्सवातील षष्ठीला दुर्गामातेचे माहेरी आगमन झाल्यानंतर पाच दिवस दुर्गामाता तसेच सरस्वती, गणेश, आणि कार्तिक देव यांची मनोभावे पूजा, सेवा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील बंगाली कुटुंबांची उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रामध्ये दररोजप्रमाणे दुर्गामातेच्या पूजन करण्यात आले. बंगाली संस्कृतीनुसार उपस्थित महिलांनी दुर्गामातेला सिंदूर लावून बंगाली पद्धतीने पूजन करत आशिर्वाद घेतले
दुर्गामातेच्या विसर्जनप्रसंगी सिंदूर खेलाची परंपरा आहे.
बंगाली समाजाच्या महिला या विषेश प्रसंगी एकमेकींना सिंदूर लावतात.
यावेळी बहुतांश महिलांनी खास लाल बॉर्डर असलेली बंगाली साडी परिधान केली होती.
पूजेनंतर प्रत्येक महिलांनी उलुधनीच्या स्वरात, एकमेकींना पेढा तसेच रसगुल्ला भरवत एकमेकींना सिंदूर लावला तसेच पतीच्या दिर्घायुष्याची कामना केली व सिंदूर महोत्सव साजरा केला.
पूजा करत असताना देवीला लावण्यात आलेला सिंदूर सौभाग्याचे लेणं असल्याने हा सिंदूर बंगाली महिला वर्षभर वापरतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here