झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी CSK चा खेळाडू ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ऋतुराज आणि सायली यांच्यामध्ये नक्की काहीतरी शिजतंय, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. ऋतुराजने गेल्या एका मॅचमध्ये ७० धावा काढल्या आणि त्याच्या याच कामगिरीवर चाहते खूश झाले. मात्र त्याच्या या कामगिरीबद्दल नेटकऱ्यांनी अभिनेत्री सायली संजीवला शुभेच्छा दिल्या आहेत.