भारत-पाकिस्तानच्या 1971 च्या युद्धात भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 वर्षांचा गौरवार्थ देशभरात ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे भारतीय हवाईदलाने वतीने हवाई प्रात्यक्षिकेचे आयोजन केले होते. देशातील युवकांनी लष्करात दाखल व्हावे आणि याकरिता त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने विविध विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी हॉक एमके 152, सूर्यकिरण, सारंग हेलिकॉप्टर आदींचे चित्तथरारक सादरीकरण.